मोठी बातमी! कॉंग्रेसचा निष्ठावंत नेता अजितदादांच्या गळाला, बुलढाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! कॉंग्रेसचा निष्ठावंत नेता अजितदादांच्या गळाला, बुलढाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

Dilipkumar Sananda Joins NCP : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी (Dilipkumar Sananda) काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पक्ष संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळे खामगाव मतदार संघात कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. सानंदा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. ते चार दशकांपेक्षा अधिक काळ काँग्रेस पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ होते. त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी देखील काम केलं (Ajit Pawar) होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार

दिलीपकुमार सानंदा येत्या 12 जून रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. सानंदा काँग्रेसच्या तिकीटावर सलग 3 टर्म आमदार झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची पक्षावर नाराजी असल्याचं (Maharashtra Politics) कळतंय. अखेर कंटाळून त्यांनी 31मे रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सदस्य पदाचा राजीनामा पाठवला आहे.

उद्धव ठाकेर यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का; पाच ते सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवरMLA

दिलीपकुमार सानंदा मागील काही महिन्यांपासून नाराज असून काँग्रेसला सोडचीठी देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं होतं. आता 31 मे रोजी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आपल्या सदस्य पदाचा राजीनामा पाठवला आहे.

सदस्य पदाचा राजीनामा

राजीनाम्यामध्ये सानंदा यांनी लिहिलंय की, मी मागील 40 वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेस पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटन वाढविण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न केले आहे. पक्षाने सुद्धा मला खूप काही दिलंय, मी त्याचा ऋणी राहील. खामगाव विधानसभा मतदार संघाचा काँग्रेस पक्षाचा पक्षनेता असताना मला विश्वासात न घेता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. भाजपाच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत केली. त्यांनाच 26 एप्रिल 2025 रोजी खामगाव सद्भावना संकल्प सभेची जबाबदारी देण्यात आली होती.

हिना खान रॉकी जयस्वालसोबत विवाहबद्ध; खास फोटो शेअर करत दिली गुडन्युज!

त्यांच्याविरोधात खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वतीताई खासने यांनी 24 एप्रिल 2025 रोजी नावानिशी सर्व वरीष्ठांना तक्रार केली होती. त्यांनर याप्रकरणी अजूनपर्यंत कारवाई झाली नाही, ही बाब खूपच खेदजनक आहे.यामुळेच मी माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या क्रियाशील सदस्य पदाचा, माझ्याकडे असलेल्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेची पदांचा राजीनामा देत आहे. तरी माझा राजीनामा त्वरित स्वीकारावा, असंही सानंदा यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube