रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी; अजितदादा अपघात प्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Supriya Sule On Rohit Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांचं बारामती एका विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
Supriya Sule On Rohit Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांचं बारामती एका विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक दावे करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील आतापर्यंत दोन वेळा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी 18 फेब्रुवारीला आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना, अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटला (Pilot Sumit Kapoor) कोणी ब्लॅकमेल केला होता का? अशी शंका व्यक्त केली. तसेच तपास यंत्रणांच्या कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेत तुम्हाला भीती वाटत नााही का? असा प्रश्न रोहित पवार (Rohit Pawar) यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना मलाही यात रिस्क आहे ठाऊक आहे. परंतु कितीही रिस्क असली तरी कुणाला तरी यासाठी लढावे लागेल. मी लढतोय. त्यामुळे कुटुंब भावनिकदृष्ट्या खचले आहे. जोपर्यंत अजितदादांच्या अपघाताचा विषय मी तडीस नेत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. जी काही रिस्क असेल ते माझे कार्यकर्ते, माझी खासगी सुरक्षा व्यवस्था लक्ष देत आहे. माहिती कुठे लपवली आहे ते माझ्या घरी, कार्यालयात नसते. ती कुठे लपवलेली असते ते माझ्या जवळच्यांनाही माहिती नसते. त्यामुळे आम्ही हिंमतीने लढा देतोय. अजितदादांचा घात की अपघात याचा निष्कर्ष येईपर्यंत आम्ही लढत राहू असं रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
तर आता आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे.
व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.
आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही…
— Supriya Sule (@supriya_sule) February 19, 2026
राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
