सरकारला किंमत मोजावी लागणार; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, फडणवीसांवर गंभीर आरोप

Manoj Jarange serious allegations Fadnavis मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Jarange Fadanvis

government will to pay price Manoj Jarange is back in fray serious allegations against Fadnavis : मराठा आरक्षण आणि संबंधित मागण्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथून बोलताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत, मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा दावा केला. मराठ्यांचं जितकं वाटोळं होईल तितकं काम फडणवीस करत आहेत, असा आरोप जरांगे यांनी करत राजकीय वातावरण पुन्हा तापवलं आहे.

ब्रेकिंग : अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली

जरांगे म्हणाले की, मराठा समाजातील तरुण मोठे होऊ नयेत, त्यांना न्याय मिळू नये, अशीच भूमिका सरकारची असल्याचे दिसते. “ज्या समाजाच्या जिवावर मोठं व्हायचं, त्याच समाजाच्या लेकरांचे बळी घ्यायचे, ही वृत्ती योग्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. मराठा आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबांना अद्याप मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आलेली नसल्याचाही त्यांनी आरोप केला.

उपचाराच्या पैशांसाठी हॉस्पिटलला लुटण्याचा प्लॅन; यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब

हैदराबाद गॅजेटिअरचा जीआर निघाल्यानंतरही कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप होत नसल्याची तक्रार जरांगे यांनी केली. तसेच, ज्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्यांनाही व्हॅलिडिटी प्रमाणपत्र दिले जात नसल्याने मराठा समाजात नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. सातार संस्थानच्या गॅजेट संदर्भातील जीआरही सरकार जाणीवपूर्वक काढत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

बेरोजगार हे झुरळांसारखे, माध्यमे, आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात; सरन्यायाधीश सूर्य कांत यांची टिप्पणी

या सर्व मुद्द्यांवर न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा देत जरांगे यांनी उद्या सकाळी 11 वाजता नव्या आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे सांगितले. “उद्या आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर वार्‍यासारखे मराठे अंतरवालीत येतील. मराठ्यांपुढे शहाणपण चालणार नाही, वठणीवर आणीन,” असा गंभीर इशारा त्यांनी सरकारला दिला.

Video : तुझा संतोष देशमुख करू; गेवराईजवळ किर्तकार महाराजांना बेदम मारहाण

मराठा आंदोलक म्हणून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत असलेल्या जरांगे यांनी या आंदोलनात सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असेही स्पष्ट केले. त्यामुळे उद्याच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले असून मराठा आंदोलनाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

follow us