…म्हणून ग्रामपंचायतीने थेट एनर्जी ड्रिंक्स बंदीचा ठरावच पारित केला
![…म्हणून ग्रामपंचायतीने थेट एनर्जी ड्रिंक्स बंदीचा ठरावच पारित केला …म्हणून ग्रामपंचायतीने थेट एनर्जी ड्रिंक्स बंदीचा ठरावच पारित केला](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/cold-drinks_V_jpg--1280x720-4g.webp)
Gram Panchayat banning Energy Drinks after minor boy died : अनेक प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स बाजारात विकायला असतात. मात्र यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. असाच प्रकार अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे घडला आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी कॉल्डड्रिंक च्या अतिसेवनाने एका १७/१८ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बळी घेतला आहे.
IND vs ENG 3rd ODI : भारताचा धमाकेदार विजय, 142 धावांनी पराभव करत इंग्लंडचा केला व्हाईटवॉश
या पार्श्वभूमीवर गावातील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट गावातील सर्वच अवैध व्यवसाय, गुटखा, दारू, कॉल्डड्रिंक बंद करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे या मागणीनंतर महिलांच्या मागणीचा विचार करत ग्रामपंचायतने लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला आहे.
‘संजय राऊत जे बोलले ते बरोबरच, पवारांनी विश्वासघात केला’; विनायक राऊतही संतापले…
या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाच स्वागत केल असून आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केले जात नाही. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. यावर पडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच इरफान पिरजादे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.