दिल्लीतील आंदोलन संपताच पालकमंत्री शिरसाट अभिजीत दिपकेंच्या घरी…, कुटुंबाच्या भेटीचं काय दिलं कारण?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 'दैनिक सामना'ला दिलेल्या मुलाखतीत इंडिया आघाडीबाबत शिरसाट यांनी वक्तव्य केलं आहे.

News Photo   2026 07 26T145422.125

दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आक्रमक (Delhi) आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीसह देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे चर्चेत आहेत. ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. दरम्यान, या घटनेंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिपके यांच्या आई वडिलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, दिपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध आहेत. आंदोलनादरम्यान प्रकरणाला राजकीय वळण लागू नये म्हणून घरी आलो नव्हतो. आता अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असून सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. त्यावर दिपके यांच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीचा परिणाम, राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज

मंत्री शिरसाठ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळं मनातील प्रश्न मिटला. आंदोलनादरम्यान राजकारण होऊ नये म्हणून आंदोलनाच्या काळात ते आले नव्हते. आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’ला दिलेल्या मुलाखतीत इंडिया आघाडीबाबत शिरसाट यांनी वक्तव्य केलं आहे.

आघाडी ब्लॉक झाल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, इंडिया आघाडी गेल्या लोकसभेनंतर ब्लॉक झाली, त्यांच्यात कुठेही एकवाक्यता नाही. दिल्लीच्या आंदोलनात देखील आपापले आंदोलन करीत श्रेय घेण्याची चढाओढ त्यांच्यात सुरू होती. आता इंडिया आघाडी राहिली नाही. आता उद्धव ठाकरे यांना मान्य करावेच लागेल, असे त्यांनी म्हटलं आहे.

follow us