मोठी बातमी! आता ट्रक, ट्रॅव्हल्सवर मराठीतच संदेश, परिवहन मंत्र्यांचा आदेश; गुढीपाडव्याचा मुहूर्त..

Mumbai News : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत मायमराठीचा गौरव केला. त्यानंत आता राज्य सरकारनेही मराठी भाषेचा सन्मान वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गुढीपाडव्यापासून (30 मार्च) मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या मुहूर्तावर परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहीले गेलेले सामाजिक संदेश मराठी भाषेतच असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा आहे. मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकारची आह. याचाच एक भाग म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांनर हिंदी किंवा अन्य भाषांत सामाजिक संदेश लिहीलेले असतात. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात अडथळे निर्माण होतात. मात्र यात बदल करून मराठी भाषेत सामाजिक संदेश आणि प्रबोधनात्मक जाहीराती केल्यास त्याचा मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारास फायदा होईल असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन PM मोदींनी 13 कोटी मराठी जनतेला आनंद दिला; अजित पवार
मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच अन्य महत्वाच्या जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरू करावी अशा सूचना परिवहन आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
दरम्यान, राज्यात सध्या मराठी आणि अमराठी भाषकांतील वाद मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. मराठी भाषा बोलण्यास नकार दिला म्हणून मराठी व हिंदी भाषकांतील वादाच्याही घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत हा नवा आदेश येऊन धडकला आहे. आता या आदेशाने व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेत सामाजिक संदेश लिहावा लागणार आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतच होणार, CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती