स्थानिक नेतृत्त्वाला… स्थानिक स्वराज्य संस्था संस्थांच्या निवडणुकांवर सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Harshvardhan Sapkal on MVA Alliance in Elections of Local Self Government : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणं तापलेलं आहे. त्यात सर्वच पक्षांकडून निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांना तसे आदेश दिले जात आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे अद्याप गुदस्त्यात आहे. त्यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले आहे.
विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपने गुंड, मवाली पोसले; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
पुण्यामध्ये कॉंग्रेसच्या कार्यक्रमानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास उत्तर दिली. त्यामध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का? या प्रश्नावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीने दोन निवडणुका एकत्र लढवल्या त्यानंतर आता थेट 2029 ला निवडणुका आहेत. पण त्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आम्ही स्थानिक नेतृत्त्वाला अधिकार दिला आहे. मात्र जे भाजपच्या विरोधात असतील त्यांच्यासोबत आघाडी करण्यात कोणतीही अडचण नाही.
त्यांचं राजकारण कचराकुंडीत गेलं; सोबत जाणारा समाप्त होईल, राज ठाकरेंना भाजप खासदारने डिवचलं
सत्यजीत तांबे यांना मी डेमो देऊ शकतो…
महाराष्ट्र विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसवर (Maharashtra Congress) जोरदार हल्लाबोल करत आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकर कोणाला भेटत नाही तसेच आमचे फोन उचलत नाही असा आरोप देखील आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. तर लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
धक्कादायक! इंटरनेटशिवायही होतो सायबर हल्ला; मामोना रॅन्समवेअरचा धोका कसा टाळायचा? जाणून घ्या…
लेट्सअप मराठीशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी आमचे नेते आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी हजारो कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. तर राहुल गांधी कोणत्याही वेळी सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असतात. मात्र काही लोक रिपीट रिपीट कॅसेट वाजवत आहे. जर तुम्हाला राहुल गांधी यांना काही सांगायचे असेल तर त्यासाठी पक्षात एक सिस्टिम आहे. या सिस्टिम जवळ तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकतात. मात्र दरवेळी मीच चांगला आणि माझ्या हिशोबाने निर्णय घ्या असं होत नाही. असं लेट्सअप मराठीशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तर याबाबतचा डेमो मी सत्यजीत तांबेंना दाखवू शकतो असं देखील सपकाळ म्हणाले.