राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी; वाचा काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी देखील सुनावणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी तारीख दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी देखील सुनावणी झाली. (NCP) यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. काही काळानंतर कोर्टाने नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या गटाला दिलं होतं. मात्र, आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही कोर्टात आहे. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.
सुनावणीच्या सुरुवातील शरद पवारांचे वकील कपिल सिब्बल यांनी मला सुनावणीसाठी 2 तास लागतील अशी माहिती दिली. यावर कोर्टाने तुम्ही सुरुवातीला कोणत्या प्रकरणाचा युक्तिवाद करणार आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर वकिलांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर आता 21 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग : धनुष्यबाण चिन्ह अन् शिवसेना पक्षाबाबत SC कोर्टात 12 नोव्हेंबर रोजी होणार फैसला
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आता 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यावेळी अजिप पवारांचे वकील पक्षातून बाहेर पडलेले आमदार अपात्र कसे नाहीत याबाबत युक्तीवाद करणार आहेत. तर शरद पवारांच्या वतीने पक्ष सोडताना या आमदारांनी नियमांचे उल्लंघन केले आणि त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी याबाबत मागणी करणार आहेत.
शरद पवारांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोरदार तयारी करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत विजय मिळवून आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांचा आहे. शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आपले नशीब आजमावणार आहे.
