लपून छपून भेटणार नाही; उद्धव ठाकरे भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस थेट बोलले
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : नुकतंच राज्यात राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून या
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : नुकतंच राज्यात राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असताना राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी रात्री 2 वाजता भेट घेतली असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्याने आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
तर दुसरीकडे कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून करण्यात आला आहे. लपून छपून भेट करण्याची आवश्यकता नाही असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जर माझ्याशी बोलायचे असेल अथवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती उघडपणे होऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत, की जे लपवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोकं जाणीवपूर्वीक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सला नोटीस बजावण्यात येईल असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मुखवटाधारी इराणी कमांडोंनी भारतीय जहाजे घेतली ताब्यात; कारण काय?
मध्यरात्री दोन वाजता भेट – प्रबुद्ध भारत मीडियाचा दावा
प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने असा दावा केला होता की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री दोन वाजता भेट झाली आहे. या वृत्तानंतर दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत होता. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतीही भेट झाली नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आता राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.