बाहेर पडताना काळजी घ्या! मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट; घाटमाथ्यांवर ऑरेन्ज, कोकणाला यलो अलर्ट

Heavy Rain Alert In Maharashtra : राज्यात आज पुन्हा पावसाची (Heavy Rain) ताकद वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची (Maharashtra Rain) अपेक्षा आहे.
मध्य महाराष्ट्रात ऑरेन्ज अलर्ट
मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यास ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी या भागात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल! मध्यरात्री पारनेरमध्ये जंगी स्वागत, पुण्यात वाहतूक व्यवस्था बदलली
कोकणासाठी यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
Rainfall over Mumbai during past 24 hours. pic.twitter.com/OYIRZBWGgf
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 27, 2025
विदर्भ, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस
पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगावसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
चलो मुंबई म्हणत जरांगे पाटलांची आर-पारची लढाई; वाचा, काय आहे मराठा आरक्षण प्रश्नाचा इतिहास?
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, वारे अन् विजांचा कडकडाट होऊ शकतो. या भागातील नागरिकांनी पावसाच्या तयारीसाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.