लंडनच्या म्युझियममधील वाघनखे शिवरायांची नाहीत; इंद्रजीत सावंतांनी सत्य केलं उघड

लंडनच्या म्युझियममधील वाघनखे शिवरायांची नाहीत; इंद्रजीत सावंतांनी सत्य केलं उघड

Indrajit Sawant : राज्य सरकारकडून लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयात असलेली वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. मात्र, इतिसहासकार इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) ही वाघनखे शिवरायांची नसल्याचं सातत्याने सांगत आहेत. त्यांच्या म्हणण्याला आता लंडनच्या व्हिक्टोरिया अॅंड अल्बर्ट म्युझियमने दुजोरा दिलायं. शिवरायांची वाघनखे असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं पत्रच म्युझियमकडून सावंतांना पाठवण्यात आल्याचा दावा सावंत यांनी केलीयं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच शिवरायांची वाघनखे साताऱ्याच्या बाहेर गेलीच नसल्याचा दावाही सावंत यांनी केलायं. त्यामुळे आता राज्य सरकार भारतात आणत असलेली वाघनखे शिवरायांची आहेत की नाही? याबाबत शासंकता आहे.

…अन् किर्लोस्कर पुन्हा ऑफिसला जायला लागले, शरद पवारांनी सांगितला प्रेरणादायी किस्सा

सावंत पत्रकार परिषदेत म्हणाले, लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वाघनखे ही शिवरायांची आहेत, असा कोणताही पुरावा नाही. तर दुसरीकडे राज्य सरकार ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच असल्याचा दावा करत आहेत. वाघनखे शिवरायांचीच असल्याचा कोणताही पुरावा म्युझियम देत नाही तर मग राज्य सरकार हा दावा कसा करत आहे? ही वाघनखे साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणालाही भेट दिल्याचा कोणताही पुरावा नाहीये, यासंदर्भातील माहिती उदयनराजे महाराज स्वत:च देऊ शकतील त्यांनी पुढं येऊन बोलावं, असं इंद्रजीत सावंतांनी स्पष्ट केलंय.

पत्रात नेमंक काय म्हटलंय.?
भारतातून 1971 साली वाघनखे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये गेली आहेत. अशीच एकूण सहा वाघनखे त्यांच्याकडे आहेत. ब्रिटिश म्युझियम आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम दोन्ही वेगवेगळे आहेत. ज्या संग्रहालयातून शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत ते संग्रहालय सांगतंय की ही वाघनखे शिवरायांची नाहीत. संग्रहालयाच्या संचालकांनीही करारादरम्यान, ही शिवरायांची वाघनखे आहेत की नाही याबाबत साशंकता असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे ही वाघनखे तुम्ही भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात ही वाघनखे ठेवणार आहेत, तिथे ही वाघनखे शिवरायांचीच आहेत, याबाबत साशंकत असल्याचं स्पष्ट करावे, असं व्हिक्टोरिया म्युझियमने पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांकडून ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. या वाघनखांसाठी राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडरही काढण्यात आले असल्याचं समोर आलं आहे. ही वाघनखे शिवरायांची असल्याचं सांगून महाराष्ट्राची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही इंद्रजीत सावंत यांनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube