अनुदानासाठी कांद्याची आवक वाढली, दरात मोठी घसरण

  • Written By: Published:
अनुदानासाठी कांद्याची आवक वाढली, दरात मोठी घसरण

नाशिक : गेल्या दोन तीन महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अनेकदा रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन काळात कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतले होता. हे अनुदान 1 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आज या अनुदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी बाजारात आणला आहे. परिणामी राज्यातील मुख्य बाजारसमित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

नाशिक हा आशिया खंडात सर्वाधिक कांदा उत्पादक करणार जिल्हा आहे आज जिल्ह्यातील सर्वच बाजारसमित्यामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारसमित्यामध्ये कांद्याला 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल दर पाहायला मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात अजून देखील घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Ajit Pawar : पिकविम्यात सरकारने २००-४०० रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली! 

शेतकरी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान 1 फेब्रुवारी ते 31 या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्याने ज्या बाजारसमितीत कांदा विक्री केला त्या ठिकाणी अर्ज करवा लागणार आहे. हे अनुदान येत्या तीस दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube