पुढचे 24 तास महत्वाचे; पावसाचा जोर वाढणार, मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार कोसळणार
Maharashtra Rain Update : आज राज्यातील मराठवाडा व विदर्भ या भागात मोठा पाऊस होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. (Rain) त्याचबरोबर अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपुर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मुंबई आणि कोकणात मुंबई शहर व उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Marathwada) काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडाव असं आवहान शासनाने केलं आहे. पुढील काही तासात कोकणाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट? मनोज जरांगेंनी पवारांच्या घरासमोर उपोषण करावे; सदाभाऊ खोतांचे जरांगेंना थेट चँलेज
आज रत्नागिरीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभरत रत्नागिरीसह आसपासच्या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. तर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय काही भागांत मध्यम तर, काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
रत्नागिरी, रायगड – रेड अलर्ट
सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर यलो अलर्ट
मुंबईसह उपनगरांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या वतीनं मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 48 तासांसाठी हवामान विभागानं शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत कमाल आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पावसाची सरासरी दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली; कोकण रेल्वे 13 तासापासून ठप्प; प्रवासी अडकून पडले
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे. रविवारी सकाळपर्यंत मुंबईत 862 मिमी पावसाची नोंद झाली आहे असून मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरी 855.7 मिमी पाऊस पडला आहे. तर जून पासून आत्तापर्यंत मुंबईत 1209 मिमी पावसाची नोंद झाली आहे.