कोपरगावच्या विकासासाठी काका कोयटे सक्षम नेतृत्व : आशुतोष काळे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कॉर्नर सभांना कोपरगावकरांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाची नांदी - आशुतोष काळे

  • Written By: Published:
कोपरगावच्या विकासासाठी काका कोयटे सक्षम नेतृत्व : आशुतोष काळे

कोळपेवाडी :  काका कोयटे हे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. समताच्या माध्यमातून त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्य शहराच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचलेले आहे. सामाजिक कार्य आणि समता संस्थेच्या माध्यमातून काकांची ओळख कोपरगावकरांना आहे. त्याच्या सामाजिक कामाची व सर्वसामान्य जनतेप्रती असलेल्या जिव्हाळ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाची त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काकासाहेब कोयटे हे सक्षम नेतृत्व असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कॉर्नर सभांना कोपरगावकरांचा मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहता हि विजयाची नांदी असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

संधी दिली तर कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणार; प्रचार सभेत चैताली काळेंच मतदारांना आवाहन

कोपरगाव शहरातील प्र.क्र.०८व ०९ मध्ये आ.आशुतोष काळे यांनी कॉर्नर सभा घेवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले कि, समता संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून अन्नप्रसाद सेवा चालवली जात आहे. यात गरजू, असहाय्य, वृद्ध, अपंग आणि गोरगरीब कुटुंबांना दररोज सकाळ-संध्याकाळ घरपोच जेवणाची सेवा दिली जाते. शिर्डी येथे अनाथ आश्रम, कोपरगावात समतेची भिंत असे अनेक सामाजिक उपक्रम काका कोयटे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरात अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे जो व्यक्ती राजकारणाव्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात सक्रीय आहे अशा व्यक्तीला निश्चितच समाजाप्रती आत्मीयता आहे. त्यामुळे त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असून कोपरगाव शहराचा नगराध्यक्ष म्हणून काकासाहेब कोयटे आपली जबाबदारी चोखपणे पार पडतील याचा मला आणि कोपरगावकरांना विश्वास आहे.

कोयटेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करेल; आ. आशुतोष काळेंची ग्वाही

कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावाला १३१ कोटी रुपयांचा निधी आणला मात्र हा निधी मिळवितांना १५ टक्के निधी जो शासनाला द्यावा लागणारा १५ टक्के निधी सुद्धा मी राज्य शासनाकडून माफ करून १०० टक्के निधी मंजूर करून आणला मात्र त्याची झळ कोपरगावकरांना बसू दिली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात आपली एकमेव नगरपालिका आपली आहे ज्या नगरपालिकेला १०० टक्के निधी राज्य शासनाचा मिळालेला आहे. यापुढेही असेच विकासाचे अनेक व्हिजन मला राबवायचे आहे. कोपरगाव शहराच्या विकासाला निधी मिळविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार नेहमीच सहकार्य करतात व यापुढेही त्यांचे सहकार्य राहणार आहे. त्यामुळे कोपरगावच्या सर्वागीण विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या ज्याप्रमाणे चाळीस वर्षाचा पाणी प्रश्न शब्द दिल्याप्रमाणे सोडून दाखविला त्याप्रमाणे यापुढील चार वर्षात विकासाचे सर्वच प्रश्न सोडवून दाखवणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला सांगितले.

follow us