Kalwa Hospital : रुग्णांची फुप्फुसं खराब, मधुमेह अन् मेंदुला ट्रॉमा, तरीही आम्ही.., डीनने मृत्यूचं कारण सांगितलं

Kalwa Hospital : रुग्णांची फुप्फुसं खराब, मधुमेह अन् मेंदुला ट्रॉमा, तरीही आम्ही.., डीनने मृत्यूचं कारण सांगितलं

Kalwa Hospital : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी 6 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर आणखी 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणावर रुग्णालयाचे डीन राकेश बारोट यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी रुग्णांचा मृत्यूचं कारणंही स्पष्ट केलं आहे.

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

राकेश बारोट म्हणाले, मृत व्यक्तींमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्यायलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. इतर रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते, त्यातील एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला.

तसेच अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्याचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नसल्याचं राकेश बारोट यांनी सांगितलं आहे.

Devendra Fadanvis : पुणे विचारवंतांचे शहर, इथे निर्णय घेणे अवघड; पुणेकरांना फडणवीसांचे मिश्किल टोले

आरोग्यमंत्री म्हणाले :
हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. पण मृत्यू हा मृत्यूच असतो. पुरोगामी महाराष्ट्रात घडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या घटना माझ्यासारखा मंत्री मुळीच सहन करणार नाही. आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेत असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान, या रुग्णालयात गरीब रुग्ण येत असतात, या रुग्णांसाठी 500 बेडच्या रुग्णालयात आम्ही 600 रुग्ण अॅडमिट केले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर्स 24 तास काम करत आहेत. कोणत्याही स्थितीत आम्ही रुग्णांवर उपचार करतो, असंही बारोट म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube