महापालिका निकालाआधीच कल्याणमध्ये भाजपचा सलग दुसरा विजय; आज होणार घोषणा?
Kalyan-Dombivli Municipal Corporation Election : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून
Kalyan-Dombivli Municipal Corporation Election : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, कल्याण – डोबिंवली महापालिका निवडणुकीत निकालाआधी भाजपने सलग दुसरा विजय मिळवला आहे. कल्याण डोबिंवली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता असताना आता प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावारी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यामुळे भाजपने निकालाआधीच कल्याण डोबिंवली महापालिका निवडणुकीत (Kalyan-Dombivli Municipal Corporation Election) दोन नगरसेवक बिनविरोध केले आहे. प्रभाग क्रमांक 26 क मधून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने आसावरी नवरे (Asavari Navare) यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आज 31 डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करत त्यांच्या बिनविरोध निवडची घोषणा करणार आहे.
तर दुसरीकडे कल्याण डोबिंवली महापालिकामधील प्रभाग क्रमांक 18 अ मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित होता. या जागेसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत फक्त भाजपच्या (BJP) उमेदवार रेखा चौधरी (Rekha Chaudhary) यांचा एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे रेखा चौधरी यांची देखील कल्याण डोबिंवली महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी आज त्यांच्या कागजपत्रांची तपासणी करत त्यांच्या विजयीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षात भारताचा टॅरिफ अटॅक; चीनसह तीन देशांमधून आयात होणाऱ्या स्टीलवर 3 वर्षांसाठी लादले शुल्क
तर दुसरीकडे राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
