मुंबईत पाय ठेवताच ठाकरेंना हिणवणाऱ्या मोदींची भाषा बदलली; काँग्रेसला केलं टार्गेट

मुंबईत पाय ठेवताच ठाकरेंना हिणवणाऱ्या मोदींची भाषा बदलली; काँग्रेसला केलं टार्गेट

Narendra Modi Kalyan Sabha : आज कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. दरम्यान, मुंबईत पाय ठेवताच नरेंद्र मोदी यांचा ठाकरेंवर टीका करण्याचा स्वर काही प्रमाणात नरमल्याचं दिसलं. महाराष्ट्रातील अगोदरच्या सभांमध्ये मोदींनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केले आहेत. मात्र, मुंबईकडं येताच त्यांचा ठाकरेंऐवजी काँग्रेसवर जारदार टीका केली.

 

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात शिंदेंचा घणाघात

ओबीसींच्या कोट्यातील खूप मोठी लूट

आज कल्याणमध्ये सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसंच, यावेळी मोदींनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. ‘आजही काँग्रेस आणि इंडिया आघाडी तृष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचं लक्ष एसटी, एससी आणि ओबीसीच्या आरक्षणावर आहे. त्यांनी प्रयोग सुरु केला आहे. कर्नाटकात त्यांनी त्याची लॅबोरेटरी बनवली आहे. कर्नाटकात जितके मुसलमान होते, त्यांनी रातोरात हुकूम काढला की, सर्व मुसलमान ओबीसी आहेत. ओबीसींच्या कोट्यातील खूप मोठी लूट केली. आरक्षणाची हीच लूट काँग्रेस संपूर्ण देशात करु इच्छित आहे’, असा दावा मोदींनी यावेळी केला आहे.

 

मोदी हिंदू-मुसलमान करतो

माझ्यासाठी माझ्या छवीपेक्षा हिंदुस्तानची एकता माझी प्राथमिकता आहे असं म्हणत एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाचे तुकडे करुन कुणाला देणार आहेत? काँग्रेस व्होट जिहाद करायची भाषा करत आहेत त्याला इंडिया आघाडीच्या एका तरी नेत्याने विरोध केला का? असा प्रश्नही मोदींनी यावेळी उपस्थित केला. तसंच, मोदी हिंदू-मुसलमान करतो असं म्हणतात. पण मोदी नाही तर मोदी त्यांच्या हिंदू-मुसलमानचा खेळ समोर आणत आहे असंही ते यावेळी म्हणाले.

 

राहुल गांधींवर घणाघात अन् नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक,फडणवीसांची मुरबाडमध्ये सभा

सावरकरांवर बोलत नाहीत

यावेळी मोदींनी राहुर गांधींवरही टीका केली. काँग्रेसचे शहजादे कायम सावरकरांच्या विरोधात बोलातात. परंतु जेव्हापासून निवडणुका लागल्यात तेव्हापासून त्यांनी सावरकरांबद्दल शब्दही काढला नाही असंही मोदी बोलले आहेत. तसंच, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वीर सावरकरांच्या बाजूने पाच वाक्यं बोलावीत असंही मोदी म्हणाले. त्याचबरोबर राहुल गांधींच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तस सांगितल्यामुळे ते सावरकरांवर बोलत नाहीत असंही मोदी यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज