AI University : देशातील पहिल्या ‘AI’ विद्यापीठाचा मान महाराष्ट्राला; CM शिंदेंचे कर्जतला गिफ्ट
‘AI’ University Karjat : देशातील पहिलं एआय विद्यापीठ कर्जतमध्ये सुरु केलं आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता प्रेरित शिक्षण देणारं हे भारतातील पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विद्यापीठाला मंजुरी दिली आहे.
या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. 1 ऑगस्टपासून पहिलं शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. विद्यापीठाने एआय आणि फ्युचर टेक्नोलॉजीतील पदवी आणि विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम विकसित केला आहे.
एआय प्रेरित शिक्षणाला समर्पित पहिले विद्यापीठ म्हणून नवीन युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, र्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या क्षेत्रातील खास विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम देऊ करेल. तसेच लिबरल आर्ट्स व ह्युमॅनिटीज, ग्लोबल अफेअर्स व डिप्लोमसी, कायदा, पर्यावरण व शाश्वतता आणि क्रिडी विज्ञान आदी विषयांवरील आधुनिक अभ्यासक्रमही तयार केले आहेत.
HSC Result 2023 : कोकण विभागचं पुन्हा ‘किंग’; बारावीच्या निकालावर मुलींचाच दबदबा
युनिव्हर्सल एआय विद्यापीठाचे कुलपती व संस्थापक प्रा. तरुणदीप सिंग आनंद म्हणाले की 21 शतकातील सार्वत्रिक कौशल्यांचे शिक्षण देणारे भारतातील व महाराष्ट्रातील पहिले समर्पित एआय विद्यापीठ देशाच्या व राज्याच्या वाढ आणि विकासातील एक महत्वपूर्ण प्रेरक घटक ठरणार आहे.