Ganesh Festival : कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी; पास कसा मिळणार ?

  • Written By: Published:
Ganesh Festival : कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी; पास कसा मिळणार ?

मुंबईः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार गणेशभक्तांना शनिवारीपासून टोलमाफी मिळणार आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर कालावधीसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय झाला आहे.

Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई–बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर (टोल) नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने आज पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या भाविकांची वाहने, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला ही सवलत देण्यात येत आहे.


Nana Patole : हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार, शेतकरी मरत असतांना जनतेच्या पैशांवर पंचतारांकित मौजमजा!

टोलमाफी कशी मिळणार ?
गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन या आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस, त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून ते स्टोकर्स (पासेसचा नमुना सोबतचे जोडपत्र-अप्रमाणे) आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी समन्वय साधून पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस चौक्या, आरटीओ ऑफिसेसमध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत. हे पास परतीचा प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत. तेथील पोलीस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांच्याकडून पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातून गौरी-गणपतीसाठी वाहतुकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसना पथक माफी असलेले पासेस संबंधिंत वाहनांस लावून सदरच्या बसेस रवाना करायच्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube