इर्शाळवाडीतील सर्च ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता 57 जणांना मृत घोषित करणार; पालकमंत्र्यांची माहिती

इर्शाळवाडीतील सर्च ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता 57 जणांना मृत घोषित करणार; पालकमंत्र्यांची माहिती

Irshalwadi Landslide Update: बुधवारी रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळल्यानं अनकेांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. मागील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात आलं होतं. पण, आज हे सर्च ऑपरेशन कायमचं थांबवण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी घेतला. (Irshalwadi Landslide Search operation stopped 57 missing to be declared dead)

इर्शाळवाडीत आतापर्यंत 29 मृतदेह सापडले आहेत. मात्र 57 जण बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करण्यात आले असून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. खालापूर पोलिस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत बोलतांना सामंत यांनी सांगितले की, घटनास्थळी सतत मुसळधार पाऊस आणि धुके असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. अशा स्थितीत ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह कुजू लागले आहेत. शोध मोहिमेत मृतदेहांचे अवशेष सातत्याने सापडत आहेत. त्यामुळे शोधमोहीम मागे घेण्याचा निर्णय घेत आहोत. बेपत्ता झालेल्या दरडग्रस्तांना मृत घोषित केले जाईल, असं सामंत यांनी सांगितलं.

Korea Open: चिराग आणि सात्विकने रचला इतिहास, जगातील नंबर वन जोडीला नमवत पटकावले विजेतेपद 

दरम्यान, बचावलेल्या 144 जणांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात येईल, त्यांना सिडकोमध्ये घरं देता येतील का? याबाबत मुख्यमंत्री निर्णय नक्की घेतली. दरडग्रस्तांची अवहेलना होणार नाही, असं सामंत यांनी सांगितलं.

रायगड जिल्ह्यातील खालपूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर बुधवारी (दि. 19 जुलै )ला रात्री दरड कोसळली. निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कडेला वसलेले हे गाव रात्री गाढ झोपे असतांनाच या गावातील अनेकांवर काळाने घाला घातला. यात अनेक घरं डोंगराखाली गाडली गेली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळीच घटनास्थळी पोहोचले आणि यंत्रणा कामाला लागली होती. इर्शाळवाडी गडावर असल्याने तेथे यंत्रणा पोहोचू शकत नव्हती. मनुष्यबळाच्या जोरावर बचावकार्य सुरू झालं. या घटनेत आतापर्यंत 29 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर 144 जणांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु, ज्यांचे मृतदेह सापडले नाहीत, अशा 57 जणांना आता प्रशासन मृत घोषित करणार आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube