खेडच्या सभेत राज ठाकरेंचा एल्गार, निवडणुकीआधीच केली मोठी घोषणा…
Raj Thackeray : राज्यात राजकीय घडामोडी घडत सुरु असतानाच उद्धव ठाकरेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आपल्या दौऱ्याला सुरुवात केलीय. राज ठाकरे यांनी कोकणातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून ठाकरे आज खेडमध्ये होते. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्यांना आगामी निवडणुकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असणार? याबाबत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. मागील काळात जे झालं ते झालं आता नगरपरिषदेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावरच लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली आहे. (raj thackeray has made it clear that he will fight the elections on his own without yuti)
अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता नगरपरिषदेच्या ज्या निवडणुका लढवायच्या आहेत. या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत. कोणालाही बरोबर घेऊन लढवायच्या नाहीत. कोणाशीही युती नको आणि काही भानगडीच नको. खेडमध्ये जेव्हा आपण स्वबळावर निवडणुका लढू तेव्हा निश्चित आपल्याला यश मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘एकनाथ शिंदेंना अर्थमंत्री करा अन् अजितदादांना’.. ठाकरे गटाच्या नेत्याने दिला भन्नाट फॉर्म्युला
यावेळी बोलताना त्यांनी सध्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलंय. मला आता बघायचं आहे की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करते का? की पुन्हा एकदा यांच्या पैशांच्या तमाशावर विकले जातात का? त्याच त्याच गोष्टी जर अशाप्रकारे होत असतील तुम्हीही फक्त मतदान करत बसत असाल. तर या सर्व राजकारणाला आणि निवडणुकांना काही अर्थ उरणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.
Baipan Bhari Deva : जुन्या आठवणींमध्ये रमल्या अभिनेत्री
कशासाठी निवडणुका लढवायच्या आणि उमेदवार उभे करायचे. महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्यात जनतेला आनंद मिळत असेल तर मग भोगा. येणाऱ्या पिढ्यांना हा जो सर्व चिखल केला आहे त्यात घालायचं आहे की नवनिर्माण करायचं आहे हा विचार जनतेनं करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपासून राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असून कोकणात दाखल झाल्यानंतर चिपळून, दापोली, खेडमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरेंचं फूल आणि गुलालांची उधळण करून स्वागत केलंय. पक्षाची पुर्नबांधणी करण्यासाठी राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. खेडमध्ये त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहे.