रत्नागिरीत मोठी घटना! जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे तब्बल 40 विद्यार्थ्यांना त्रास…

रत्नागिरीत मोठी घटना! जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे तब्बल 40 विद्यार्थ्यांना त्रास…

Ratnagiri News : रत्नागिरीमधील जयगडमधून एक दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरीच्या एमआयडीसी (Ratnagiri News) भागातील जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला असल्याचं समोर आलंय. या घटनेत अनेकांनी जीव गमावल्याचंही समजंतय, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडालीयं.

साखर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मितेश नाहाटाला अटक, इंदौरच्या व्यावसायिकाची २.६१ कोटींची फसवणूक

जयगडमधील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना कंपनीतील वायुगळतीमुळे त्रास झालायं. वायुगळतीमुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत आहे. आत्तापर्यंत तब्बल 40 विद्यार्थ्यांना वायुगळतीमुळे त्रास झाला असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

YRF स्पाय युनिव्हर्सची सर्वात लहान वयाची गुप्तहेर होणं… स्वप्नांच्या पलीकडचं यश; शर्वरी वाघ

दरम्यान, जिंदाल कंपनीतील टाक्यांचा मेंटेनन्स सुरु असतानाच गॅस लिकेज झाल्याचा दाट संशय आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून या घटनेमुळे परिसरातील सर्वच नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अशा घटना टाळण्यासाठी कंपन्यांकडून उपाययोजना कराव्यात, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube