भयंकर! गरोदर मैत्रिणीसह तिघांचा निर्दयी खून; दुर्वास पाटीलच सिरीयल किलर, वडिलांचा सायली बार ठरला ‘सावली’

भयंकर! गरोदर मैत्रिणीसह तिघांचा निर्दयी खून; दुर्वास पाटीलच सिरीयल किलर, वडिलांचा सायली बार ठरला ‘सावली’

Ratnagiri Crime Durvas Patil Killed Three People : रत्नागिरी (Ratnagiri) परिसरात एका युवतीच्या खून प्रकरणातून उघड झालेली माहिती संपूर्ण कोकणाला हादरवणारी ठरली आहे. अटक करण्यात आलेला दुर्वास पाटील (Crime News) हा एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खूनांचा आरोपी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या सर्व खून प्रकरणांचा धागा त्याच्या वडिलांच्या नावावर चालणाऱ्या सायली बार पर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे, (Durvas Patil Killed Three People) दुर्वासने ज्यावेळी भक्ती मयेकर हिचा खून केला, त्यावेळी ती गरोदर होती. त्यामुळे तिच्या गर्भातील बाळाचाही जीव गेला आहे.

तीन खुनांचा थरकाप उडवणारा तपशील

तपासात स्पष्ट झालं की दुर्वास पाटीलने पहिला बळी घेतला तो सीताराम वीर (वय 50, वाटद-खंडाळा) यांचा. ते सायली बारमध्ये कामाला होते. बारमध्ये झालेल्या वादातून हात व काठीने मारहाण करण्यात आली आणि रिक्षाने घरी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तक्रार त्यांच्या मुलाने दाखल केली होती.

PHOTO : क्लासी अँड ग्रेसफुल! सईचा साडीतील लूक चर्चेत

यानंतर दुसरा खून झाला राकेश जंगम (वय 28, वाटद-खंडाळा) याचा. सीताराम वीर यांच्या मृत्यूबाबतची माहिती राकेशकडे होती. त्याने ही बाब आईला सांगितल्यानंतर तो पोलिसांकडे फिर्याद देईल, अशी भीती दुर्वासला वाटली. त्यामुळे 6 जून 2024 रोजी नीलेश भिंगार्डे याच्या मदतीने आंबाघाटात त्याचा गळा आवळून खून करण्यात आला व मृतदेह टाकून देण्यात आला.

तिसरा खून सर्वांत क्रूर ठरला. दुर्वासने आपली मैत्रीण भक्ती मयेकर (वय 26, मिरजोळे) हिचा बारच्या वरच्या खोलीत केबलने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने आंबाघाटात फेकण्यात आला. दहा दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अखेर तिचा खून झाल्याचं उघडकीस आलं. धक्कादायक बाब म्हणजे भक्ती त्या वेळी गरोदर होती.

कमबॅकनंतर अभिजीत सावंतची दमदार कामगिरी; तुझी चाल तुरु तुरुचा 15 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!

पोलिसांची शिताफीने उकल

एका खून प्रकरणात तपास सुरू असताना दुर्वासची वागणूक आणि त्याचे वाकडेतिकडे बोलणे पोलिसांना संशय आणून देत होते. अधिक चौकशी केली असता, त्याने स्वतःच तीन खुनांची कबुली दिली. या प्रकरणात दुर्वास पाटीलसह विश्वास पवार व नीलेश भिंगार्डे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुर्वासचा गुन्हेगारी प्रवास

लहानपणी आईचा मृत्यू झाल्यानंतर दुर्वास चुकीच्या मार्गावर गेला. बारमधून मिळालेला पैसा, व्यसनं आणि गुन्हेगारी सवयी यामुळे त्याची हिंस्र वृत्ती वाढत गेली. पोलिसांनी त्याच्या घरातून हॉकी स्टिक आणि इतर हत्यारे जप्त केली आहेत. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील करत आहेत. या तिहेरी खुनानंतर संपूर्ण रत्नागिरी आणि कोकण भागात संतापाची लाट उसळली. दुर्वास पाटीलला सिरीयल किलर म्हणत समाजातून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube