रामदास कदम हा तात्या विंचू, त्याला पुरून उरू; भास्कर जाधवांचा घणाघात
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिले.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा खेड (Ratnagiri) येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत आ. जाधव यांनी शिंदे गटासह माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली.
वाचा : Kasba Bypoll Result 2023 : पण मी गुडघे टेकणार नाही”, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल
ते म्हणाले, की सन 1999 मध्ये शिवसेनेची सत्ता गेली तरी कोकणातील जनतेने शिवसेनेचेच (Shiv Sena) आमदार-खासदार निवडून दिले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) कणखर नेतृत्व होते. या मैदानावर ते आले होते. त्यांनी त्यावेळी कोकणवासियांचे आभार मानले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरेही या मैदानावर येत आहेत. तेव्हा आता आपण पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वास उद्धव ठाकरेंना देऊ.
नैसर्गिक संकटाच्यावेळी उद्धव ठाकरे कोकणात आले होते. त्यांनी कोकणासाठी हजारो कोटींचा निधी दिला. तुम्ही काय दिले, काहीच दिले नाही. सध्या विधानसभेत टार्गेट करण्याचे काम सुरू आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे, की भास्कर जाधवचा आवाज बंद करू शकत नाहीत.
Mohit Kamboj : आईचे दूध प्यायला असेल तर भास्कर जाधवांना पुन्हा डिवचले
रामदास कदम यांच्यावर टीका करताना जाधव म्हणाले, की एक मराठी सिनेमा होता झपाटलेला. त्यातला हा तात्या विंचू आहे. आता हा रोज गावात जातोय. सगळीकडे फिरतोय आणि म्हणतो की मला उद्धव साहेंबानी संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढली. अरे पण, तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का, असा सवाल त्यांनी केला.
संकटाच्या काळात कधी रामदास कदम लोकांकडे गेले त्यांना भेटले, कोरोनात कदम कधी मतदारसंघात फिरले हे त्यांनी सांगावे. मंत्री असताना एक रुपयाचे काम यांनी केले का. काहीच केले नाही, अशी टीका त्यांनी केली. रामदास कदम यांच्या मुलाचा निवडणुकीत पराभव करणार असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले.