Sindhudurg News : झाडं लावलं तरच मॅरेज सर्टिफिकेट मिळणार; निसर्ग संवंर्धनासाठी ग्रामपंचायतचा हटके उपक्रम

Sindhudurg News : झाडं लावलं तरच मॅरेज सर्टिफिकेट मिळणार; निसर्ग संवंर्धनासाठी ग्रामपंचायतचा हटके उपक्रम

Sindhudurg News : निसर्ग संवंर्धनासाठी झाडं लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक स्तरावर झाडे लावणे आणि ते जगवणे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यात आता एका ग्रामपंचायतने देखील निसर्ग संवंर्धनासाठी ग्रामपंचायतने हटके उपक्रम केला आहे. काय आहे या ग्रामपंचायतचा हा उपक्रम जाणून घेऊ… (Sindhudurg News Kinjavde Grampanchayat Great initiative for nature marriage certificate )

Territory Teaser Out: जंगलातील वाघाचा शोध अन्…;’टेरिटरी’ या थरारक सिनेमाचा टिझर आउट

काय आहे या ग्रामपंचायतचा हा उपक्रम?
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवडे या ग्रामपंचायातने हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे निसर्ग संवंर्धन होणार आहे. तसेच लोकांचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे. या ग्रामपंचायतने आता नवविवाहित दाम्पत्यांना त्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक झाडं लावणे बंधनकारक केले आहे.

त्यांनी एक पत्र स्वतःलाच लिहीलं असतं तर.. रस्त्यातील खड्ड्यांवरून फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला

यामध्ये नवविवाहित दाम्पत्यांना त्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक झाडं लावतानाचा फोटो अपलोड करायचा आहे. त्याची पडताळणी झाल्यावरच संबंधित नवविवाहित दाम्पत्यांना त्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. या ग्रामपंचातच्या या उपक्रमाचं सर्व स्तरावर कौतुक केलं जात आहे.

किंजवडे हे गाव ऐतिहासिक गाव आहे. तेथे नेहमीच काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावारणातील बदल या विभागामार्फत राबविला जाणारा उपक्रम ‘माझी वसुंधरा अभियान’ या अंतर्गत गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवकांनी आता नवविवाहित दाम्पत्यांना त्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक झाडं लावणे बंधनकारक केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube