महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? बारसू रिफायनरीवरुन ठाकरे संतापले…

महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? बारसू रिफायनरीवरुन ठाकरे संतापले…

महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प सगळे गुजरातकडे वळवले आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारख्या प्रकल्पांना गुजरातमध्ये हलविल्याने उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागलीय. आज मुंबईत उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

MI vs PBKS: सूर्या-इशानचं तुफान फलंदाजी, सलग दोन सामने जिकंत मुंबईने रचला इतिहास…

ठाकरे म्हणाले, ज्यावेळी नाणार प्रकल्प रद्द केला तेव्हा दिल्लीतून चांगला प्रकल्प असल्याच्या सूचना आल्या होत्या. मात्र, बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दल विचित्र मत प्रसिद्ध झाली आहेत. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात जर प्रदुषण होत असेल तर ते मी खपवून घेणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितलंय.

तसेच आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखे प्रकल्प भाजपने गुजरातकडे वळवले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात राख आणि गुजरामध्ये रांगोळी असा आहे का? असा सवाल करीत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

निवृत्तीचा निर्णय शरद पवारांनी एकट्याने का घेतला?

लोकांची बाजू घेऊन प्रकल्पाला तुम्ही विरोध करा, लोकांसमोर जाऊन प्रकल्पाचं सादरीकरण करा, लोकांचे गैरसमज दूर करा नाहीतर प्रकल्प दूर करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सरकारला केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीच्या बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला होता. हे आंदोलन इतकं पेटलं की, पोलिसांकडून आंदोलकांना लाठीचार्जही करण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावलंय.

दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात जे काही गैरसमज पसरलेले असतील, ते गैरसमज राज्य सरकारने त्यांच्याशी चर्चा करुन दूर केले पाहिजेत. याउलट सरकारकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. आंदोलनकर्त्यांच्या डोक्यावर बंदुक ठेऊन परवानग्या घेऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलंय. तसेच मी बारसूच्या लोकांना भेटायला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube