लेट्सअप स्पेशल : शिवसेना UBT मधील प्रभावी वक्ता कोण ? सुषमा अंधारे पेक्षा भास्कर जाधवांना नेटकऱ्यांची पसंती

  • Written By: Published:
लेट्सअप स्पेशल : शिवसेना UBT मधील प्रभावी वक्ता कोण ? सुषमा अंधारे पेक्षा भास्कर जाधवांना नेटकऱ्यांची पसंती

लेट्सअप स्पेशल : शिवसेना ; उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रभावी वक्ता कोण ? अथवा तुम्हाला कोणाची भाषण ऐकायला आवडतील अशा आशयाचा सर्वे लेट्सअपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आला आहे. या सर्व्हे मध्ये सध्या गाजत असलेले संजय राऊत आणि राज्यात सभा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे याना मागे टाकत भास्कर जाधव हे प्रथम क्रमांकावर आले आहेत.

लेट्सअप ने केलेल्या सर्व्हे मध्ये भास्कर जाधव यांना ६३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर संजय राऊत यांना फक्त ९ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. तर सुषमा अंधारे या या सर्वेमध्ये नंबर दोनवर असून त्यांना २८ टक्के लोकांनी  पसंती दिली आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…

गेल्या अनेक दिवसापासून संजय राऊत आणि भाजप आणि शिवसेनेच्या विशेषतः शिंदे समर्थक नेत्यांमध्ये रोज आरोप प्रत्यारोप यांची मालिकाच सुरु आहे. संजय राऊत यांच्या जहाल बोलण्याने सेना भाजप नेते अधिकच आक्रमक होताना दिसतायेत. ही लढाई आता जनतेला रोजच झाली आहे. एव्हाना संजय राऊत यांनी हे बोलायला नको होते, संजय राऊत अति करतात अशा भावना आता जनतेतून उमटू लागल्या आहेत. म्हणून की काय नेटकरी संजय राऊत यांना आता कमी पसंती देवू लागले आहेत का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या सहा महिन्यात विशेषतः संजय राऊत ईडीच्या कोठडीत गेल्या नंतर उद्धव गटाच्या तोफखाना सांभाळण्याची जबाबदारी ही सुषमा आंधारे यांनी उचलली आहे. कायद्याच्या अभ्यासक असलेल्या सुषमा अंधारे यांनी राज्यघटना आणि स्थानिक मुद्दे आणि स्थानिक राजकारणातील किस्से प्रसिद्धीला आणत शिंदेच्या शिलेदार यांना जेरीस आणले. पण गेले काही दिवस तीच ती विधान आता समोर येऊ लागल्याने आंधारे आता नेटकऱ्यांमध्ये काहीशा मागे पडल्या आहेत, असं दिसत आहे.

हेही वाचा : घरगडी घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो, उद्धव ठाकरेवर भाजपाकडून बोचरी टीका

गेल्या काही दिवसात कित्येक वर्ष फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी उद्भव गटाचा तोफखाना संभाळला आहे. शिवसेना – राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना असा भास्कर जाधव यांचा प्रवास राहिला आहे. प्रत्येक ठिकाणी भास्कर जाधव यांचा आक्रमकपणा हा कायम दिसला आहे. सभागृहात जशास तसे, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना  उत्साहित करणारे, दरारा निर्माण करणारे आणि पार्टी अंतर्गत बैठकींमध्ये मग ते शिवसेनेच्या बैठका असो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठका असो भास्कर जाधव यांनी रोखठोक बाणा जपला आहे. ते याच स्वभावमुळे कायम एवढी वर्ष चर्चेत राहिले आहेत.

राज्य विधीमंडळाचा दीर्घ अनुभव, विधिमंडळ कायद्याच ज्ञान, विरोधकांना जशास तसे उत्तर, इरसाल भाषेला त्याच भाषेत उत्तर हि त्यांची शैली सर्वांना आकर्षित करते आहे. त्यातच त्यांचा आक्रमक शैली, गरजेनुसार शब्दफेकी यासर्वामुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत. आताही राज्य विधीमंडळात प्रत्येक नेत्याला भास्कर जाधव अंगावर घेत आहे. त्याच बरोबर भाजपचे नेते मोहित कंभोज यासारख्या नेत्यांची बोलती त्यांनी बंद केली आहे. याच बाबीमुळे सध्या भास्कर जाधव हे नेटकऱ्यामध्ये पसंतीला उतरले आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?

हा सर्वे करताना यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तर तिघेही फायरब्रॅंड नेते आहेत तुलना होऊ शकत नाही. अशाही काही प्रतिक्रिया आल्या आहेत. याशिवाय भास्कर जाधव यांचं कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. “फक्त आणि फक्त भास्कर जाधव” अशी एक प्रतिक्रिया यामध्ये आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube