अपघाताचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर ‘बियर बारचा ॲक्सेस’? प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर सर्रासपणे दारु विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सातत्यानं या मार्गावर अपघात होत असताना आता दारूंच्या दुकानांमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Samruddhi Mahamarg ) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप असल्याचं निदर्शनास आलंय. अनेकदा वाहनचालक मद्यप्राशन करुन महामार्गावर ट्रक चालवत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
धक्कादायक! बापानेच पुसले मुलीचे कुंकू; संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग, जावायचा भोसकून खून
मेहकरजवळील अनधिकृत स्टॉलवर बनावट दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे ट्रकचालक अनधिकृतपणे या एक्स्प्रेसवेवर थांबून मद्य विकत घेऊन याच ठिकाणी मद्यप्राशन करून ट्रक या चालवत असतात. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, परिवहन विभाग, अबकारी कर विभाग आणि पोलीस विभाग थातुरमातुर कारवाई करून निघून जातात. यामुळे मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण राहणार? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. ‘ॲक्सेस कंट्रोल्ड’ म्हणून ख्याती आणि 120 किमी वेग मर्यादा असलेला समृद्धी महामार्ग हा या महामार्गावर होणाऱ्या अपघात आणि जीवितहानी मुळे नेहमी चर्चेत असतो.
अपघातास जबाबदार कोण ? नारायण राणेंचा स्वबळाचा नारा; दादा अन् शिंदे सेनेला एकही जागा मिळणार नाही?
समृद्धी महामार्गालगत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ महामार्गलगत बियर आणि वाईन बार आहेत. तर, मेहकरजवळ अनधिकृत स्टॉलवर, अनधिकृत आणि बनावट दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे ट्रक चालक अनधिकृतपणे या मेगा सुपर एक्स्प्रेसवर थांबून मद्य विकत घेऊन तर कधी याच ठिकाणी मध्यप्राशन करून या महामार्गावरुन ट्रक चालवतात. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र परिवहन विभाग, अबकारी कर विभाग आणि पोलीस विभाग थातुरमातुर कारवाई करून निघून जातात. मात्र, यामुळे मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण राहणार? हा प्रश्न सध्या तरी निरुत्तरीतच आहे.