Samruddhi Mahamarg Accident : PM मोदी, CM शिंदेंकडून शोक व्यक्त; मृतांना शासकीय मदत जाहीर

Samruddhi Mahamarg Accident : PM मोदी, CM शिंदेंकडून शोक व्यक्त; मृतांना शासकीय मदत जाहीर

छत्रपती संभाजीनगर : येथील नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण टेम्पो अपघात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. यातील 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, या अपघाताचे वृत्त ऐकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वरुन ट्विट करत मृतांसाठी शोक व्यक्त केला. तसंच अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्र सरकारकडून दोन आणि राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Samruddhi Mahamarg Accident: Condolences from PM Modi, CM Shinde; Government help announced for the dead)

पंतप्रधान मोदी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत माझी सहानुभूती आहे.जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडातून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली जात आहे. तर जखमींना 50,000 रुपयांची तातडीची मदत दिली जाईल.

Sanjay Raut : ‘समृद्धी’वरील मृत्यू म्हणजे सरकारी हत्या; राऊतांचा घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पो अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहीद अग्निवीरच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चा वाद चिघळला; सैन्याचं स्पष्टीकरण पण, CM मान जाब विचारणारच

पालकमंत्री, गृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेट; जखमींची विचारपूस

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. या अपघातातील जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या रुग्णालयांत मंत्री भुमरे आणि सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube