लोकसभेसाठी ठाकरेंचे स्टार प्रचारक ठरले; आमदार-खासदारांची मोठी यादी पाहाच
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) प्रत्येक पक्षाने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह 40 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीत शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, माजी खासदार अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, कोकणातील आमदार भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, अॅड. अनिल परब, राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदेश बांदेकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, सुभाष वानखेडे, अभिनेते किरण माने, खासदार ओमराजे निंबाळकर, आनंद दुबेस, जान्हवी सावंत, आमदार सुनील शिंदे, वैभव नाईक, नितीन देशमुख, सचिन अहिर, माजी खासदार प्रियांका चतु्र्वेदी, विशाखा राऊत, नितीन बानुगडे पाटील, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नावांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्धीस देण्यात आली.
लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या चाळीस जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचाही समावेश करण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या यादीतही अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.