लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल, 9 रुपये संपत्ती असलेले महास्वामी गडकरींविरोधात रिंगणात

लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल, 9 रुपये संपत्ती असलेले महास्वामी गडकरींविरोधात रिंगणात

Venkateswara Mahaswami : लोकसभा निवडणुकीच्य (Lok Sabha elections) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच जागांवर निवडणूक होणार आहे. नागपुरातून भाजपने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आता गडकरींनी नागपुरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या सभा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ ​​दीपक कटकधोंड यांनी नागपुरातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. व्यंकटेश्वर महास्वामी (Venkateswara Mahaswami) यांची संपत्ती केवळ ९ रुपये आहे.

नवोदय विद्यालयामध्ये 1377 शिक्षकेत्तर पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 1,12,400 रुपये पगार 

कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ ​​दीपक कटकधोंड यांनी महाराष्ट्रात पहिला उमेदवारी अर्ज भरला आहे. खरंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे आपल्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहेत. 2019 मध्ये सोलापुरात झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जात पडताळणी अर्ज अवैध ठरल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्याचवेळी भाजपने आपल्याला सोलापूर पोटनिवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी व्यंकटेश्वर महास्वामी यांनी केली होती. मात्र सोलापुरात पोटनिवडणूक झाली नाही. त्यामुळे त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

अजितदादांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘शिवतारे बापूंची’ ताकद नेमकी किती? 

दरम्यान, व्यंकटेश्वर महास्वामी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, माझा हा प्राथमिक स्वरुपातील अर्ज असून आफण नितीन गडकरी यांच्यसाठी मतदान मागणार आहोत.

व्यंकटेश्वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉमची पदवी घेतली आहे. त्यांच्या नावावर कोणतीही चल-अचल संपत्ती नाही आणि त्यांच्यावर कोणावर अवलंबून नाही, आपली संपत्ती केवळ ९ रुपये असून असून आपल्यावर ४५ हजार रुपयांचं कर्ज असल्याचं त्यांनी २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं.

दरम्यान, भाजप नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनीही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube