वडेट्टीवारांचा प्रश्न अन् अजित पवारांची सहमती; महाराष्ट्र सदनातील शाहू मराजांचा पुतळा बदलणार
Shahu Maharaj statue : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांचा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा साजेसा नसल्याने तो बदलण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी विधानसभेत केली. त्यावर, हा पुतळा बदलण्याची सरकारची तयारी आहे, (Ajit Pawar) असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट; तीन तास बंद दाराआड खलबत
शाहू महाराजांच्या दिल्लीतील या पुतळ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. अनेक शाहूप्रेमींनी त्याबाबत आक्षेप घेतले आहेत. हा पुतळा कृश आहे, डोळे आत गेलेले आहेत, एकूणच शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब या पुतळ्यात उमटत नाही. या आधी जो पुतळा बसविलेला होता, तो बदलण्याची गरज नव्हती, पुन्हा तोच पुतळा बसवावा. कोल्हापूरच्या दसरा चौकात महाराजांचा जसा पुतळा आहे तसाच बसविण्यात यावा अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
दुधाला ३० रुपये दर आणि पाच रुपयांच्या अनुदानावर शासनाकडून शिक्कामोर्तब; मंत्री विखेंची माहिती
वडेट्टीवारांच्या या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, शाहू महाराजांचे वंशज असलेले छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खासदार म्हणून दिल्लीत गेलेले आहेत. ते महाराजांचे वारसदारच आहेत. तेव्हा त्यांच्याशी मी या पुतळ्यासंदर्भात चर्चा करेन. गरज भासल्यास त्यांना मी दिल्लीत जाऊनही भेटेन. पुतळा बदलण्याची सरकारची तयारी आहे. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसाच पुतळा असायला हवा, ही सरकारची भूमिका आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले.