Mahadev Jankar : २०२४ ला मी खासदार होणारच

Mahadev Jankar : २०२४ ला मी खासदार होणारच

पुणे : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पक्षासारखा माझा पक्षही फार छोटा आहे. विद्यार्थी मित्रहो मी फार छोटा माणूस आहे. मात्र, माझ्या पक्षाचे १०-१२ आमदार जर निवडून आले तर मीही खासदार म्हणून राज्यसभेवर जाईन. माझ्यावर बारामतीकरांचे मोठे उपकार आहेत. मागील निवडणुकीत मला केवळ बारामती शहरातून कमी लीड मिळाले. त्यामुळे मी थोडक्यात हरलो. परंतु, आता ते टार्गेट मी २०२४ धरले आहे. त्यामुळे २०२४ ला मी खासदार (MP) होणारच आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर बोलत होते. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, खासदार रामदास तड्स आणि मनसेचे नेते वसंत मोरे उपस्थित होते.

जानकर म्हणाले की, युवा संसद उपक्रमामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला खासदार, आमदार, नगरसेवक अन जिल्हा परिषद सदस्य होण्याची प्रेरणा मिळत आहे. कॉलेज जीवनात मी महात्मा फुले, कार्ल मार्क्स, स्वतंत्र्यावीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामायण, महाभारत असे सगळेच वाचले आहे. माझं नशीब चांगलं आहे की मला कांशीराम, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान लोकांचा सहवास लाभला. कांशीराम यांच्याबरोबर मी तीन वर्षे देशभर फिरलो. पक्ष कसा बांधायचा हे मला कांशीराम यांनी शिकवले. त्यामुळे मी माझा पक्ष उभा करू शकलो. मी चार ठिकाणी लढलो. पण हरलो. आज माझ्या पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube