सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. मात्र, ही स्थगिती एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारने नुकतीच हटविली आहे. जिल्हा बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे लेखी आदेश सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी सहकार आयुक्तांना काढले आहेत. सध्याच्या सरकारने बँकेच्या कारभाराची पुन्हा चौकशीचे आदेश दिल्याने जयंत पाटील […]
मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून संप सुरुच आहे, त्यामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरातील 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे. संपाचा फटका आरोग्य व्यवस्थेला बसतो आहे. धक्कादायक बाब […]
मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट सुरु झाली आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या मुंबईसह बहुतांश जिल्ह्यातलं तापमान 15 अंशांच्या खाली गेल आहे. मात्र, 5 किंवा 6 जानेवारी नंतर राज्यामध्ये थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा […]
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]
धाराशिव : धाराशिवमधील परंडा तालुका म्हणजे कमी पावसाचा भाग. अशातच अर्थिक परिस्थिती जेमतेम तरीही संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत शेतकऱ्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी पदी विराजमान झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेल्या यशाबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्राद्वारे कौतुक केलंय. सावंत पत्रात म्हंटले, धाराशिवमधील परंडा तालुक्यातील लाकीबुकी येथील भास्करराव गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून सालगडी म्हणून कार्यरत आहेत. […]
अहमदनगर : जिल्ह्यातील कोविड उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच कोविड उपाय योजनांची पाहणी केली. केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने १९ कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेसाठी […]