‘तुम्ही तिकडे गेले अन् गप्प बसले’; नाशिक-मुंबईच्या ट्राफिक जामवर थोरातांचा भुजबळांना चिमटा
Maharashtra Assembly Session : नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले.
रईस शेख यांनी हा प्रश्न विचारला कारण त्यांचं ते कार्यक्षेत्र आहे. पण त्याही पेक्षा जास्त त्रास आपल्या तिघांना होतो. आता तुम्ही ट्रेननं, विमानानं की गाडीने प्रवास करता माहित नाही. त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये दोन मंत्रीही आहेत. रईस शेख बोलले ते खरं आहे. आपण तिकडं जाऊन बसले आणि गप्प बसले. इथं असते तर आज आरडाओरडा केला असता तुम्ही, अशा शब्दांत थोरात यांनी नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ यांना चिमटा काढला.
आमदार रईस शेख यांनी नाशिक मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता, तरी मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
Mahadev Jankar : राजकारणातली सर्वात मोठी चूक कोणती? जानकरांनी बेधडक सांगूनच टाकलं
थोरात म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव, धुळे, नगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबई मध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? मंत्री महोदयांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता, असा टोला त्यांनी मंत्र्यांना लगावला.
मी सुद्धा दोन किलोमीटर पायी चाललो
एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. ॲम्बुलन्स मला या प्रवासात वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या दिसल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल, मंत्रिमहोदय उत्तरात सांगतात की ऑगस्ट 2024 पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील. मंत्री महोदय असे चालणार नाही हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील, असे थोरात म्हणाले.
“अन् टोल नाका फुटला” : अमित ठाकरेंनी सांगितली मध्यरात्रीच्या खळ्ळखट्याकची हकीकत
यावर मंत्री दादा भुसे यांनी, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करून आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान 50 टक्के बदल झालेला दिसेल असे सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित मंत्र्यांना दिल्या.