‘दादांचा वादा’, ‘फेक नरेटिव्ह’ अन् ‘विरोधकांचे चेहरे’; CM शिंदेंनीही केला हिशोब क्लिअर

‘दादांचा वादा’, ‘फेक नरेटिव्ह’ अन् ‘विरोधकांचे चेहरे’; CM शिंदेंनीही केला हिशोब क्लिअर

Eknath Shinde on Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळ्याच (Eknath Shinde) मूडमध्ये होते. काल अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर विरोधकांकडून यावर प्रचंड टीका करण्यात आली. विरोधकांच्या या टीकेचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधी नेत्यांना खोचक टोले लगावले. शिंदे बोलत असतानाच विरोधक गोंधळ घालत होते. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी तंबी दिल्यानंरतर मात्र विरोधक शांत झाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी केलेली टीका केली. खरंतर अर्थसंकल्प इतका चांगला आहे यावर काही बोलायचाच त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून आता त्यांच्याकडून खोट बोललं जात आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशी वाण नाही पण गुण त्यांना लागला आहे. मी टीव्हीवर त्यांचे चेहरे पांढरेफटक पडले होते.

मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेनंतर शिंदेंनी जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना

फेक नरेटिव्ह चालणार नाही

पण आता विरोधकांनी खरं ऐकण्याची सवय ठेवावी. अर्थसंकल्पात सर्वांचा विचार केला आहे. आता फेक नरेटिव्ह चालू शकत नाही. निवडणुकीत खोट्या गोष्टी पसरवल्या.  खोटं बोलून लोकांची मतं घेतली तरी देखील तुम्ही मोदींना रोखू शकला नाहीत. आता येथून पुढे फेक नरेटिव्ह चालणार नाही असा स्पष्ट मेसेज शिंदेंनी विरोधकांना दिला.

मी कधीच खोटं बोलत नाही. मी सगळं उघड करतो. दोन वर्षांपूर्वी उघड केलं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली. तुम्ही खोटं बोलून लोकांची मतं घेतली. पण आता फेक नरेटिव्ह चालणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

अजितदादांचा वादा पक्का, थेट जीआरच दाखवला

काल अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सरकार खोटं बोलत असल्याचे विरोधक म्हणत होते. त्यावर अजितदादांचा वादा पक्क असतो असे म्हणत शिंदेंनी सभागृहात थेट शासन आदेशच दाखवला. तसेच युवकांना दहा हजार रुपये सरकार देणार आहे. आता हे पैसे डीबीटीने ज्यावेळी त्यांच्या खात्यात जातील तेव्हा तुम्हाला खरं वाटेल असे शिंदे म्हणाले.

बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक; वाचा, काय आहे कारण

ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना

लाडकी बहीण ही योजना काल लागू करण्यात आली. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत. तसचे महिलांसाठीही मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या घोषणा केलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवीन योजना लागू केली आहे. या योजनेनुसार आता राज्य सरकारच ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. प्रताप सरनाईक यांनी एक तासापूर्वी सभागृहात मागणी केली होती. अवघ्या तासात मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज