Maharashtra BJP : कार्यकारिणीत तळागाळात झटणाऱ्या कार्यकर्त्यांना मानाचे पान; राजकीय हस्तक्षेपाला लावला चाप
प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी)
भाजपच्या राज्य कार्यकारणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली. गेल्या अनेक वर्षानंतर राजकीय लोकप्रतिनिधी यांचा संघटनेतील सहभाग संपुष्टात आणला आहे. तसेच ब्राह्मण बनिया या चेहऱ्याकडून मराठा ओबीसी आणि अतीपिछाडा अशा समजाला कार्यकारणीत मोठं स्थान देण्यात आले आहे.
कार्यकारणीत उपाध्यक्ष सरचिटणीस आणि चिटणीस अशा विविध पदांवर आधी आमदार, खासदार किंवा सरकारमध्ये ज्याला काही मिळालं नाही अशा नेत्यांची वर्णी लावली जात होती. पण यंदा ही प्रथा बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी ज्यांनी ग्राउंड लेव्हलला चांगलं काम केलं आहे त्यांना स्थान देण्यात आले आहे. विशेषत: बुथ पातळीवर काम संघटन हा मुद्दा अधिक विचारात घेण्यात आला आहे.
Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप
अनेक वर्षात पक्षात ब्राम्हण बनिया विशेषत: हिंदी भाषिक व्यापारी वर्गाचा भरणा देखील अधिक करण्यात येत असे यावेळी हे देखील टाळण्यात आले आहे. याऐवजी मराठा ओबीसी आणि अतिपिछाडा या समाजतील कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी देण्यात आली आहे, हे आता या नव्या कार्यकारिणीतून स्पष्ट होत आहे.
आगामी काळात असलेलत्या स्थानिक स्वराज्य संस्था , विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका पाहता तळागाळात काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नेहमीच बूथ मजबूत करण्याचा आग्रह असतो. त्यानुसार ही कार्यकारिणी बदलण्यात आल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीत राजीनामा नाट्य तर भाजपकडून ऑफर, बावनकुळे म्हणाले…
या कार्यकारिणीत स्थानिक राजकीय हस्तक्षेप देखील कमी करण्यात आला आहे, हे पाहता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याना कार्यकारिणी निवडीसाठी पूर्ण मोकळीक देण्यात आल्याचे आता दिसून येत आहे. या कार्यकारिणीमध्ये लोकप्रतिनिधी यांना स्थान नसेल तर पक्षाला त्यांच्या जबाबदारीसाठी नवीन व्यवस्था करावी लागेल हे मात्र नक्की आहे.