“उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, संकटात मदतीसाठी पहिल्यांदा धावून जाईन”; PM मोदींचं मोठं विधान
PM Narendra Modi on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) एका मुलाखतीची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होऊ लागली आहे. याचं कारण म्हणजे या मुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खास वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. संकटाच्या काळात त्यांच्या मदतीसाठी मी सर्वात आधी धावून जाईन असं वक्तव्य पीएम मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं.
Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं
सद्यस्थितीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार आहेत. पण तिथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ही माझी बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. उद्धव ठाकरेंचा मी नेहमीच सन्मान करतो. ते काही माझे शत्रू नाहीत. जर त्यांच्यावर काही संकट आलं. त्यांना काही अडचणी आल्या तर मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन. बाळासाहेबांच्या विचारांसाठीच मी जगतोय. माझ्यावर त्यांचं जे प्रेम होतं या त्यांच्या कर्जाचं मला कधीच विस्मरण होणार नाही.
आज महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर भाजप सरकार आहे. राज्यात आमच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीदेखील मुख्यमंत्री मात्र शिवसेनेचा आहे. आता ही शेवटचीच निवडणूक असेल असा जो आरोप विरोधकांकडून होत आहे त्यालाही मोदींनी उत्तर दिलं. 2014 च्या निवडणुकांवेळीही ते असेच म्हणत होते. आताही ते असेच म्हणत आहेत. विरोधकांकडे आता दुसरे काहीच शिल्लक राहिलेले नाही म्हणून ते असा अपप्रचार करत आहेत.
राज्यात PM Modi यांच्या सभांचा धडाका, वेगवेगळ्या लूकने केले मतदारांना आकर्षित; पाहा फोटो
यानंतर मोदी काँग्रेसवरही बरसले. काँग्रेसने आपला छुपा अजेंडा लपविण्यासाठी खोटे बोलण्यास सुरुवात केली आहे.व्होटबँकेला सांभाळण हा त्यांचा एक छुपा अजेंडा आहे. जर राम मंदिरात गेलो तर व्होटबँक निघून जाईल याची काळजी त्यांना होती. याच व्होटबँकेला वाचविण्यासाठी त्यांनी राम मंदिरात जाणे देखील बंद केले आहे.