हवामान विभाग विरुद्ध पंजाबराव डख : कोणी, काय वर्तविला पावसाचा अंदाज?

हवामान विभाग विरुद्ध पंजाबराव डख : कोणी, काय वर्तविला पावसाचा अंदाज?

Weather Update : यंदा मान्सूनच्या लहरीपणाचा फटका पावसाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पंजाबराव डख यांनाही बसला. मान्सूनच्या सुरुवातीपासूनच भारतीय हवामान विभागासह कुणाचेच अंदाज खरे ठरत नव्हते. डख यांचे अंदाज यावेळी खूप चुकलेत अशी चर्चा शेतकऱ्यांतही होती. मात्र कालपासून राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या पावसाने त्यांचा अंदाज खरा ठरला. आता भारतीय हवामान विभाग आणि पंजाबराव डख यांनी रविवारी राज्यातील हवामान कसे असेल याचा अंदाज वर्तवला आहे.

पंजाबराव डख यांनी याआधी एक अंदाज व्यक्त केला होता. मान्सूनचे आगमन 8 जूनला मात्र चक्रीवादळामुळे मान्सून कमकुवत झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मान्सून 22 जूनला स्थिर होणार आणि 23 जूनपासून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि पुढे 24 जूनपासून पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज डख यांनी सांगितला होता.

त्यांचा हा अंदाज मात्र खरा ठरला. राज्यात 23 जूनपासून पावसाची परिस्थिती तयार झाली होतीच. नंतर 24 जूनला राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता रविवारी काय स्थिती असेल याचा अंदाज डख यांनी दिला आहे.

25 जूनपासून ते 2 जुलैपर्यंत राज्यात पाऊस होईल. या कालावधीत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. जून अखेरपर्यंत बहुतांश जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस होईल. राज्यात पूर्व आणि पश्चिम भागात नागपूर, अमरावती विभागात जोरदार पाऊस होईल. बीड, नगर, धाराशिव, सोलापूर, लातूर आणि कोकण या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल.ॉ

हवामान विभागानेही दिला अंदाज

दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने आजच्या हवामानाचा अंदाज दिला आहे. हवामान विभागाचे के. एस. होसळीकर यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की 25 जून रोजी ठाणे आणि अंतर्गत भागात तसेच कोकणात ढगाळ हवामान असेल. येत्या तीन ते चार दिवसात कोकणात पर्जन्यमानात वाढ होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube