अजितदादा आमचे कॅप्टन, मध्येच शस्त्र टाकू शकत नाही; बड्या नेत्यानं भरला विश्वास
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. मात्र, आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने अजितदादा मध्येच शस्त्र टाकू शकत नाही ते निवडणूक लढविणार असा विश्वास छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार हे बारामतीतून निवडणूक हरणार, हे निश्चित आहे. त्यांनाही याची कल्पना असल्याचे म्हटले आहे. (Chagan Bhujbal On Ajit Pawar Election Statement)
पुण्यात भाजपला मोठा धक्का! माजी आमदार शरद पवारांच्या गळाला, थेट उमेदवारीच जाहीर
अजित पवार आमचे कॅप्टन
भुजबळ म्हणाले की, अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन असून, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत. ते निवडणूक लढविणारच असून, दादांनी लोकसभा निवडणुकीत जे झाले त्याबाबत व्यथा मांडल्याचे भुजबळ म्हणाले.
कोणताही नेता आधी विजय संपादन करा हेच सांगणार
देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले आहेत. त्यांनी वाद निर्माण करू नका, हे सांगणे स्वाभाविक आहे. कोणताही नेता हेच सांगणार आहे. आधी विजय संपादन करा, असे भुजबळ यांनी म्हटले. मुंबईत जगातील जास्तीत जास्त गणेश उत्सवाचे कार्यक्रम होतात असेही भुजबळ म्हणाले. महायुतीच्या तिन्ही घटकांना चांगले यश मिळवायचे असेल तर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करू नये विरोधकांना खाद्य देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे भुजबळ म्हणाले.
फडणवीसांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार विरोधात बोलणार नाहीत; जरांगे पाटील असं का म्हणाले?
जशी पुंजी जमा होणार तसे पैसे देणार
यावेळी भुजबळांनी योजनांचे पैसे जमा होत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपावरही उत्तर दिले. ते म्हणाले की, सरकार सर्वांचे पैसे देणार आहे. जशी पुंजी जमा होते तसे पैसे दिले जातील. एखाद्या योजनेचे पैसे देण्यास उशीर होणे हे काही नवीन आहे का? असा उलट प्रश्न उपस्थित करत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात 2/3 वर्षे उशिरा पैसे मिळत होते.