Ajit Pawar यांनी प्रतिभाकाकींचा शब्द अखेर मानला, पवारांनीही नंतर केलं माफ!
Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर घेतलेली शपथ अजूनही राजकारणात चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत या घटनेवर सविस्तर भाष्य केले आहे. अजित पवारांची कृती निःसंशय पक्षशिस्तीचा भंग करणारीच होती. मात्र,अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितनं प्रतिभा काकींना ‘जे झालं ते चुकीचं होतं आणि घडायला नको होतं,’ अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली.आमच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. अजितशी बोलल्यावर यावर नक्कीच तोडगा निघेल आणि झालंही तसंच. त्याच्या या भूमिकेनंतर अखेर या वादावर पडदा पडला, असे शरद पवार यांनी सांगितले.
या घटनेची माहिती देताना पवारांनी म्हटले, की अजितची कृती म्हणजे पक्षशिस्तीचा निःसंशय भंग होत असल्यामुळे त्याच्यासकट कुणाचीही गय केली जाणार नाही, या माझ्या परखड निवेदनामुळे संशयाचं धुकं दूर झालं. अजित विधिमंडळ राष्ट्रवादीचा नेता असल्यानं त्याच्याकडे सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांची पत्रं होती हे वास्तव, परंतु ती भाजपाला पाठिंबा देण्यासाठीच वापरली जातील, हे सत्य दडवण्यात आलं होतं.
पचनी पडण्यावरुन उद्धव ठाकरे-चंद्रशेखर बावनकुळेंची जुंपली…
या पत्रांचा गैरवापर झाल्याचं मी बोलून दाखवलं. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार सभागृहात बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असं सांगून आरपारच्या लढाईचे मी संकेत दिले. याच्यातून अजित आणि त्याच्या बरोबरच्यांना योग्य तो इशाराही पोहोचलाच, परंतु त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आणि भाजपाच्या मनमानी खेळीलाही चाप बसला.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करायला परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात ‘महाविकास आघाडी’च्यावतीनं तातडीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आलं. बंडानंतरच्या तातडीच्या हालचालींमुळे ‘महाविकास आघाडी’च्या गोटातली अस्वस्थता संपुष्टात आली.
अपेक्षेप्रमाणे फडणवीसांचं सरकार आणि अजितचं बंड औटघटकेचं ठरलं. न्यायालय ही एक रणभूमी होती, परंतु अजितचा विषय आमच्या पक्षांतर्गत कळीच्या मुद्द्याप्रमाणे कौटुंबिकही होता. त्यानं बंड केलेलं असलं तरीही तो पक्षातून बाहेर पडलेला नव्हता, ही जमेची बाजू होती. अजितचे बंधू श्रीनिवास यांनाही त्याच्याशी संवाद ठेवायला सांगितला. त्यातून एक घडलं, अजितची बंडाबाबतची भूमिका निवळायला सुरुवात झाली.
अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…
माझी पत्नी प्रतिभा राजकीय घडामोडींत कधीही पडत नाही, परंतु अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितनं प्रतिभाला ‘जे झालं ते चुकीचं होतं आणि घडायला नको होतं,’ अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. आमच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. त्याच्या या भूमिकेमुळे भेटून, विषयावर पडदा पडला होता. अजितशी बोलल्यावर तिढा नक्की सुटेल, अशी माझी खात्री होती. झालंही तसंच, असे पवा म्हणाले.
म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले
विधिमंडळ पक्षात अजितला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच्याविषयी पक्षाच्या कुणाचाच मूड प्रतिकूल नव्हता. अजितच्या कामाचा झपाटा, सहकाऱ्यांना विश्वास देण्याची त्याची पद्धत आणि कितीही काम करण्याची तयारी यांमुळे त्याच्या नेतृत्वाबाबत विधिमंडळ सदस्यांच्या मनात सन्मानाचं स्थान आहे. अजितची ही स्वकष्टार्जित कमाई आहे आणि मला याची पूर्ण जाणीव असल्यानं आम्ही अजितला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.
मात्र या अनपेक्षित आणि धक्कादायक घडामोडीचा फायदा असा झाला, की ‘महाविकास आघाडी’ची वज्रमूठ आणखी घट्ट झाली. शिवसेनेची विशेषतः त्यांच्या केडरमधलीही भाजपाविषयीची उरलीसुरली सहानुभूती संपुष्टात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तरच सरकार मजबूत राहील, असं माझं मत होतं, राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही त्यांच्या नावाला सहमती होती. राष्ट्रवादीमधले आणि काँग्रेसमधले अनेक जण मंत्रिपदाचा दीर्घ अनुभव असलेले होते. आसपासच्या श्रेष्ठत्वाच्या नेतेपदाच्या मानापमानापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणं अधिक मानवणारं. सोयीस्कर होतं.