विखे पाटलांच्या संस्थानात झाकीर नाईक साडेचार कोटी का देतो? शिंदेंच्या ‘त्या’ मंत्र्यांवर राऊतांचे गंभीर आरोप
Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद पेटल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी अलीकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत बारा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काल ईडीने ठाकरे गटाशी संबंधित काही ठिकाणांवर छापे टाकले. या प्रकारावरून ठाकरे गटाचे नेते कमालीचे भडकले आहेत. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची यादीच जाहीर केली.
काल नाकाने कांदे सोलणारे फडणवीस या नेत्यांवर कारवाई करतील का, असा सवाल राऊत यांनी केला. ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांचा गणेश सहकारी साखर कारखान्यात पराभव का झाला. तर भ्रष्टाचारामुळेच त्यांचा पराभव झाला. तुमच्या भाजपच्या लोकांनीच पराभव केला. राधाकृष्ण विखे यांच्या संस्थानात झाकीर नाईक साडेचार कोटी रुपये का देतो?ईडी किंवा फडणवीस यांची या प्रकाराची चौकशी करण्याची हिंमत आहे का? असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले.
राष्ट्रवादीला ठोकला रामराम; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा बीआरएसमध्ये प्रवेश
आत गृहमंत्रालयाने ईडीला पत्र लिहावे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यात झाकीर नाईक साडेचार कोटी रुपये का पाठवतो. याच झाकीर नाईकवर केंद्र सरकारने टेरर फंडिंगचा आरोप केला आहे. ते साडेचार कोटी झाकीर नाईकने का पाठवले, ते पैसे कसे आले, त्या पैशांचे काय व्यवहार झाले होते, तसेच काय हालचाली होत्या असे अनेक सवाल राऊत यांनी उपस्थित केले.
कुल यांच्या मनी लाँड्रिंगचे पुरावे आमच्याकडे
या प्रकारांची गृहमंत्री म्हणून जर फडणवीस यांना माहिती नसेल तर आम्ही माहिती द्यायला तयार आहोत. राहुल कुल यांच्या पाचशे कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत. यासंदर्भात काल आणि परवा सगळी कागदपत्रं ईडीकडे पोहोचली आहेत. त्याची पोचपावती माझ्याकडे आहे. राहुल कुल भाजपचे दौंडचे आमदार आहेत. फडणवीसांचे एकदम खास आहेत. यावर आता फडणवीस काय करतात, असे राऊत म्हणाले. मंत्री दादा भुसे यांची चौकशी कधी होणार, असा प्रश्न राऊत यांनी केला.
‘अजितदादांचं काम उत्तमच पण, इतरांनी काही’.. राऊतांनी काँग्रेसला दिला इशारा
अब्दुल सत्तार यांचीही कागदपत्रे ईडीकडे जातील
राऊत पुढे म्हणाले, उद्या अब्दुल सत्तार यांच्या साडेसातशे कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगची कागदपत्रे ईडीकडे जातील, करता कारवाई? यावर बोलण्याची हिंमत आहे का? तुमच्यात हिंमत असेल तर भ्रष्टाचाराविरोधात खरं काही बोलायचं असेल तर आपल्या घरापासून साफसफाई करा. भ्रष्टाचार झाला असेल तर फक्त राजकीय विरोधकांवरच धाडी का. वर्षा बंगल्यावर जाऊन पहा त्यातलेच वर्षा बंगल्यावर बसले आहेत.