केसरकरांनी दिला जुन्या फॉर्म्युल्याचं रिमाइंडर; शिंदे गट भाजपसाठी ठरणार डोईजड?

केसरकरांनी दिला जुन्या फॉर्म्युल्याचं रिमाइंडर;  शिंदे गट भाजपसाठी ठरणार डोईजड?

Deepak Kesarkar : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप-शिंदे गटात जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात शिंदे गटाने भाजपकडे 22 जागांची मागणी केली असून या प्रस्तावाला भाजपने नकार दिल्याचे समजते. या घडामोडींवर आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

केसरकर यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावर केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. केसरकर म्हणाले, जागावाटपाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा मु्द्दा आहे. लोकसभेची तयारी प्रत्येकाने सुरू केली पाहिजे. किती जागा मिळतात हे फार महत्वाचे नाही. जागा जिंकणं हे जास्त महत्वाचं असतं.

AAP च्या एन्ट्रीने बिघडला खेळ! केजरीवाल-मोदी संघर्षात काँग्रेसचा सायलेन्स मोड

शिंदे गटाने 22 जागा मागितल्या का या प्रश्नावर केसरकर म्हणाले, मी काही प्रवक्ता नाही. जागावाटपाबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे आधीचे सूत्र होतं ते कायम राहिल अशी आमची अपेक्षा आहे. या सूत्रानुसार थोड्या जागा आधिकच्या हे भाजप आधीपासूनच घेत आला आहे लोकसभेबाबत. शिवसेना राज्यात जास्त लक्ष केंद्रीत करत आली आहे. आमच्या वाट्याला ज्या जागा येतात त्या जागांसदर्भात तयारी करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे तयारी केली तर त्यात चुकीचं काही नाही.

अधिवेशाआधीच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार 

राज्य सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही त्यांनी भाष्य केले. अधिवेशन सुरू होण्याआधी मंत्र्यांना त्यांच्या विभागांची तयारी करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे शंभर टक्के. पण किती आधी होईल हे ठरविण्यात येईल आणि ते करतील. फक्त याबाबत निश्चित तारीख आता सांगता येणार नाही. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे शंभर टक्के खरं आहे.

संजय राऊत कन्फ्यूज 

जागावाटपाबाबत संजय राऊत यांनी शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या तरी खूप आहे अशी टीका केली होती. त्यावरही केसरकर यांन पलटवार केला. केसरकर म्हणाले, संजय राऊत बोलतात त्यावर फार बोलणं योग्य नाही. त्यातून लोक आणखी कन्फ्यूज होतील. ते स्वतःच कन्फ्यूज असतात ते काय बोलतात याबद्दल काही माहिती नसते यावर संशोधन करणे गरजेचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube