इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी; घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला रुग्णवाहिका भेट

इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी; घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला रुग्णवाहिका भेट

Pune News : सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या मदतीबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचे ट्रस्टकडून आभार व्यक्त करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेणे खूप गरजेचे असते. याकामी रुग्णवाहिकेची सर्वाधिक गरज असते. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली तर रुग्णांना दवाखान्यात नेता येते. हाच विचार डोळ्यांसमोर ठेऊन फाऊंडेशनने ही मोलाची भेट ट्रस्टला दिली.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. आठ ते नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून याठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. ट्रस्टकडून नुकतीच राजारामबापू पाटील संस्थेला एक रुग्णवाहिका देण्यात आली. तसेच राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनीमार्फत अनेक मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात.

Punit Balan यांच्या मनात नक्की काय? जाणून घ्या त्यांचा प्रवास Letsupp Business Maharajas मध्ये

कॅम्पमध्ये सहभागी रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणखी एका ॲम्ब्युलन्सची गरज होती. त्यासाठी ट्रस्टने युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे तशी मागणी केली. त्यांची गरज ओळखून आणि त्यांचे सामाजिक कार्य पाहून पुनीत बालन यांनी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून रुग्णवाहिकेसाठी अर्थसाह्य केले. त्याबद्दल ट्रस्टच्यावतीने बालन यांचे आभार मानण्यात आले.

रुग्णाला वेळेत उपचार मिळाले तर तो निश्चितपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी रुग्णवाहिका ही अत्यंत अत्यावश्यक आहे. आरोग्य सेवेत ‘डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्ट’चं कार्य कौतुकास्पद असून या कार्यामुळेच त्यांच्या मागणीवरून ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली. या माधयमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना मदत होईल, असा विश्वास फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनित बालन यांनी यावेळी व्यक्त केला.

Punit Balan Group चा स्तुत्य उपक्रम; राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज