Sangli Lok Sabha : कॉंग्रेसच्या हालचाली वाढल्या! विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू; थोरातांचं वक्तव्य

Sangli Lok Sabha : कॉंग्रेसच्या हालचाली वाढल्या! विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू; थोरातांचं वक्तव्य

Balasaheb Thorat On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही तणाव आहे. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यानंतर नाराज असलेल्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, यावर आता बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) भाष्य केलं.

आढळराव यांचे जुन्नरचे टेन्शन गेले : बेनके, सोनवणे आणि बुचके यांची वज्रमूठ बांधली 

आज बाळासाहेब थोरातांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. सांगली लोकसभेविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळेल, असे थोरात म्हणाले. सांगलीचा तिढाहदी देखील आम्ही लवकर सोडवू. तसेच विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू, असं वक्तव्य थोरात यांनी केलं.

सुप्रिया सुळेंना 35 लाखांचा तर अजित पवारांना दिलंय 63 लाखांचा कर्ज, सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती? 

मतविभाजन होण्याची शक्यता
विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल केला. त्यामुळं विशाल पाटील, चंद्रहार पाटील यांच्यात होणाऱ्या मतविभाजनचा फायदा भाजपच्या संजय काकांना होऊ शकतो. त्यामुळं कॉंग्रेसकडून हालचालींना वेग आला. आता कॉंग्रेसने ठाकरे गटाला ऑफर दिली. सांगलीऐवजी उत्तर मुंबईची जागा घ्या, असा प्रस्ताव कॉंग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर ठेवला आहे.

कॉंग्रेसची ठाकरे गटाला ऑफर
उद्धव ठाकरेंकडून आणि चंद्रहार पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आम्हाला आशा आहे. चंद्रहार यांनी उमेदवारी मागे घेतल्यास आम्ही त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊ. यासोबतच उत्तर मुंबईची जागाही ठाकरेंना सोडण्यात येईल. पाटील यांच्यासाठी हा चांगला प्रस्ताव आहे, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. दरम्यान, 2019 मध्ये आम्ही कोल्हापूर, हातकणंगलेच्या जागा जिंकल्या. पण आम्ही त्या जागा सोडल्या आहेत. त्यामुळं आम्हाला सांगलीची जागा हवी, असा युक्तिवाद ठाकरे करत आला. त्यामुळं ठाकरे गट कॉंग्रेसची ऑफर स्वीकारणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज