आम्हाला मिंधे म्हणता, खोके म्हणता पण राऊत आमच्यामुळेच.. उदय सामंतांचा राऊतांवर हल्लाबोल

आम्हाला मिंधे म्हणता, खोके म्हणता पण राऊत आमच्यामुळेच.. उदय सामंतांचा राऊतांवर हल्लाबोल

Uday samant on Sanjay Raut : शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार पलटवार केला. सामंत म्हणाले, की आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून राऊत यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. आम्हाला मिंधे म्हणता, खोके म्हणता पण, आमच्या 41 मतांमुळेच तुम्ही राज्यसभेवर गेलात हे विसरू नका असे सामंत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, त्यांच्या वक्तव्याला मी मनोरंजन म्हणून पाहतो. सत्ता गेल्यानंतर एवढी चीडचीड देशात फक्त महाराष्ट्रातच दिसत आहे. राऊत यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. उद्याची सभा पाहिल्यानंतर ते पुन्हा येथे सभा घेण्याचे धाडसही करणार नाहीत असेही सामंत म्हणाले.

Uday Samant यांचा मोठा दावा म्हणाले, आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानावर जाहीर सभा होत आहे. ही सभा त्याच मैदानावर होत आहे. जेथे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यामुळे शिंदे गटाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या निमित्ताने विरोधकांना आव्हान दिले आहे. सामंत म्हणाले, की उद्याची सभा पाहिल्यानंतर विरोधकांची पुन्हा येथे सभा घेण्याची हिंमत होणार नाही ते धाडसही करणार नाहीत.

सामंत पुढे म्हणाले, की आमची सभा कुणाला लांडगे किंवा कोल्हे म्हणण्यासाठी नाही. आमदार योगेश कदम यांच्या विजयाचा पाया यानिमित्ताने रचला जाणार आहे. येथे सभा घेऊन रामदास कदम यांच्याबद्दल काहीतरी बोलायचे माझ्याबद्दल काहीतरी बोलायचे यामुळे काही फरक पडत नाही.

वाचा : Kolhapur Munciple Corporation : ४२ गावांच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर उदय सामंत काय म्हणाले?

उलट अशा वाईट प्रवृत्तींमुळे आमची मते वाढणार आहेत. सभेसाठी आम्ही बाहेरून लोकं आणलेली नाहीत. शिंदेंचे विचार ऐकण्यासाठी लोक स्वतःहून येत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून आरोप होत असले तरी त्यांना तसे बोलावे लागते, असे सामंत म्हणाले.

आमची सभा कुणाला शिवीगाळ किंवा लांडगे कोल्हे म्हणण्यासाठी नाही. जे आम्हाला लांडगे कोल्हे म्हणाले ते शरद पवार आणि अजित पवारांना काय म्हणाले होते हे उद्या दिसेल असेही सामंत म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube