Sanjay Raut : राऊतांकडून आदित्य ठाकरेंची थेट ऑस्करशी तुलना
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांचे कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांचा जगातील युवा नेत्यांचा टॉप शंभर जणांमध्ये समावेश झाल्याबद्दल त्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. परवाच भारताला ऑस्कर मिळाला आणि आज आदित्य यांचा युवा नेतृत्वामध्ये समावेश झाला ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेब ठाकरे हे देखली जगातील एक शक्तीशाली नेते होते. अशा बाळासाहेबांचा नातवाचा समावेश हा जगातील 100 युवा नेत्यांमध्ये व्हावा ही महाराष्ट्रासाठी व भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग
आदित्य ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, आर्थिक व पर्यावरण या विषयात काम करत आहेत. या युवा नेतृत्वाच्या यादीमध्ये आदित्य यांचा समावेश ही एकप्रकारे त्यांच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, असे ते म्हणाले आहेत. कालच आपल्या देशाला ऑस्कर मिळाला व आदित्य यांचा समावेशा जागतिक युवा नेत्यांमध्ये झाला ही भारतासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे परिवार व ठाकरेंचे कार्यकर्ते यांना टारगेट करण्याचे काम चालू आहे. या देशातल्या न्यायालयामधला न्याय अजून मेला नाही. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. सध्या फक्क ठाकरे परिवाराला टारगेट करण्याचे काम चालू आहे, असे ते म्हणाले आहेत.
सत्तासंघर्षाच्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांनी केली प्रश्नांची सरबत्ती
तसेच दिल्लीत आपचे दोन मंत्री, राज्यात मी, अनिल परब, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर प्रत्येकावर सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. खरंतर खोक्यावाल्या सरकारच्या संपत्तीचा हिशोब मागायला पाहिजे. पण ते आम्हाला हिशोब मागतात. तुम्ही आमच्यावर कितीही हल्ले करा पण आम्ही तुमचा प्रत्येक हल्ला परतावून लावू, असे संजय राऊत म्हणाले.