‘पवार साहेब हाच का तुमचा पुरोगामीपणा?’ राम मंदिरावरील वक्तव्यानंतर भाजपाने विचारला तिखट सवाल

‘पवार साहेब हाच का तुमचा पुरोगामीपणा?’ राम मंदिरावरील वक्तव्यानंतर भाजपाने विचारला तिखट सवाल

Sharad Pawar Comment on Ram Mandir : लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह साधू संतांच्या उपस्थितीत राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळाही पार पडला. देशात अजूनही राम मंदिराची चर्चा होत असते. त्यात आता राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? हा मुद्दा पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा ठरेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, एका बैठकीत काही महिलांनी तक्रार केली की रामाचं सगळं सांगितलं जात आहे मग सीतेची मूर्ती का बसवत नाही? राम मंदिर आता होऊन गेलं. त्याची चर्चाही आता कुठे होत नाही. या सरकारबद्दल लोकांच्या मनात कमालीची नाराजी मात्र आहे. सरकारने घोषणा खूप केल्या पण त्यांची अंमलबजावणी मात्र केली नाही. देशाचं चित्र मला सांगता येणार नाही पण लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांना सरकारबद्दल आजिबात आस्था नाही, असे दिसते.

Ayodhya Ram Mandir सोहळ्यानंतर राज्यातील राम मंदिरांमध्ये गर्दी वाढली; दानात दीडपट वाढ

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. भर सभेत शरद पवारांनी देशाला रामायण महाभारताची गरज नाही असं संतापजनक वक्तव्य केलं होतंच मात्र आता अयोध्येतील राम मंदिरात सीतामातेची मूर्ती का नाही असा पोरकट प्रश्न त्यांनी विचारला. मुळात मंदिरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती ही बालरुपातील आहे, असे भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे.

आयुष्यभर ज्यांनी राम मंदिराला विरोध केला तेच आज राम मंदिराबद्दल बोलत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अशा प्रकारचे वक्तव्य करून देशातील तमाम रामभक्तांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. एकीकडे सुनेला बाहेरची म्हणून हिणवणे आणि दुसरीकडे असे वक्तव्य हाच का तुमचा पुरोगामीपणा असा सवाल भाजपने पवारांना विचारला आहे.

Sharad Pawar: ..तर पाणी मिळणार नाही; बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी

अयोध्येत राम मंदिर उभारलं गेलं याची पोटदुखी शरद पवारांना होत असावी. निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने असे मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीने या ट्विटमधून केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज