सावधान! थंडीच्या कडाक्यात पावसाची एन्ट्री, ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. उत्तर भारताकडून ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगाने वारे (Weather Update) वाहत असल्याने कधी नव्हे इतकी थंडी वाढली आहे. मात्र उत्तरेकडील थंड वारे येत असले तरी बंगालच्या उपसागरात फेइंजल वादळामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज तर राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आण हलक्या पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यात आणखी काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.
शनिवारी नाशिक जिल्ह्यातील जेऊर येथे नीचाकी तापमान 6 अंश तर अहिल्यानगर येथे 8.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यानंतर आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने नाशिकला यलो अलर्ट दिला. तसेच सोमवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेतील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, पुढील 2 ते 3 दिवस कडाक्याची थंडी, IMD ने दिला इशारा, नाशिकला यलो अलर्ट
विदर्भातही पावसाचा अंदाज
हवामान विभागाने विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह काही जिल्ह्यांत कमी उंचीवरील ढग दिसतील. त्यामुळे या ठिकाणी हलका पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. श्रीलंकेजवळ तयार झालेले चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकू लागले आहे. पुदुच्चेरीजवळ वादळ धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वादळाचा परिणाम म्हणून दक्षिणेतील राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
थंडीचा कडाका वाढणार पण..
राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार (Cold Wave) असला तरी जळगाव, धुळे आणि नाशिकच्या काही भागांत मात्र थंडी कमी होईल. या ठिकाणी तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यत आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अन्य ठिकाणी मात्र थंडी कमी होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
तीन दिवस सावधान, ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् 75 किलोमीटर वेगाने वारे, अलर्ट जारी