आतली बातमी फुटली! अजितदादा मनातलं खातं मिळवण्यात यशस्वी; भाजप, शिवसेनेकडे काय?
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास 21 दिवसांनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे लागलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खात्यांचा कारभार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. गृहनिर्माण आणि पर्यटन ही दोन नवी खाती नव्याने मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Video : सभागृहात बंधने आली तर… रास्ता तो मेरा है; नाराज भुजबळांनी अखेर रान पेटवलचं
अजितदादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?
सूत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे अर्थखात, महिला बालकल्याण, कृषी, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा, मदत पुनर्वसन आदी खात्यांचा कारभार येणार असल्याची माहिती आहे. राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती आहे.
भाजपकडे कोणती खाती?
गृह
महसूल
सार्वजनिक बांधकाम
पर्यटन
ऊर्जा
शिवसेनेकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी?
नगरविकास
गृहनिर्माण
Video : छगन भुजबळांचा नवा राजकीय अजेंडा ठरला?; व्हाया भाजपा करणार नव्या इनिंगला सुरूवात
अजितदादांना मिळालं मनातलं खातं पण, शिंदेंच्या पदरी नाराजी
मंंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी राष्ट्रवादीकडून अर्थखात आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून गृहखात्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शिंदेंच्या मागणीला भाजपकडून थेट नाकरण्यात आले होते. तर, दुसरीकडे अजितदादांना अर्थखातं देण्याबाबतही संभ्रम होता. मात्र, आता अर्थ खात्याची जबाबदारी अजितदादांना देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अजितदादांच्या मनातलं खातं मिळवण्यात दादा अखेरीस यशस्वी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना गृहखातं न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
पत्ता कट झाल्यानंतर भुजबळांचा एल्गार
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बंडाचं हत्यार उपसलं आहे. मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या नाराज छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) अखेर मेरा वक्त भी आयेगा और तेरी राय भी बदलेगी म्हणत आता न्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. सर्व ओबीसी समाज एकत्र राहिला तर आम्ही सेफ आहोत असे म्हटले आहे.